ताज्या घडामोडीमहाराष्ट्ररणधुमाळी

शरद पवार पुन्हा लोकसभा लढवणार, माढा मतदारसंघातून रिंगणार उतरणार असल्याचे संकेत

महाराष्ट्र विश्व न्यूज, ( पुणे ) – सध्या सर्वत्र निवडणूक उमेदवारी जाहिर करण्याचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. पवार हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काॅग्रेसची पुण्यात एक सभा घेण्यात आली यावेळी ही घोषणा करण्यात आली. माढा हा महाराष्ट्रतील ४८ लोकसभा संसद सस्यापैकी एक आहे. २००८ ला या मतदार संघाची निर्मिती करण्यात आली आहे.

शरद पवार हे माढामधून लोकसभा लढवणार आसल्याचे संकेत मिळाले असले तरी देखील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारमतीमधून कोण लोकसभा लढवणार याकडे सर्वंचे लक्ष लागले आहे. तरी देखील खासदार सुप्रिया सुळे या बारामतीतून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. माढामधून इतर पक्षांचे कोणते नेते २०१९ च्या लोकसभेत शरद पवार यांना टक्कर देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ साली पवार यांनी मी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहिर केले होते. परंतु कार्येकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांची इच्छा आसल्याने ही लोकसभा लढवावी लागत असल्याचे पुण्यातील झालेल्या बैठकीत स्वतः शरद पवार म्हणाले, परंतु मी स्वतः कोणताही सध्येतरी निर्णय घेतलेला नाही. राज्यसरकारने लवकर निवडणूक लढवण्याचे ठरवले तर कदाचित या सरकार पासून सहा ते सात महिने लवकर जनतेची सुटका होईल असेही ते म्हणाले आहेत.

-

62 Views
कृपया शेअर करा
Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close