ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

शरद पवारांच्या उमेदवारीला जनतेतून विरोध

समाधान वाघमारे, ( विशेष प्रतिनिधी – माढा ) – शरद पवारांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारी वरून मतदारसंघातील जनतेतून विरोध होऊ लागला आहे. २००९ साली शरद पवार हे माढ्यातुन निवडून आले होते. त्याच वेळी पवार यांनी मतदारसंघातील लोकांना अश्वासने दिली होती. पण, पवारांच्या खासदारकीच्या कार्यकाळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होऊ शकली नाही.

मतदारसंघातील लोक स्थानिक खासदार म्हणून कामे घेऊ त्यांच्या पर्यंत सहजासहजी पोहोचू शक नव्हते, या कारणामुळे आता पवारांच्या उमेदवारीवरून जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. २०१४ च्या मोदी लाटेत आणि साखर पट्यातील स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे माढ्यातून माघार घेऊन मोहिते पाटलांच्या गळ्यात मतदारसंघ टकण्यात आला. मोहिते पाटील तेथे वैयक्तिक करिष्म्यावर निवडून आले होते. मतदारसंघात मोहिते पाटलांनी पुनर्बांधणी करत संघटन मजबूत केले २०१९ ला विकासकामांच्या जोरावर दावेदारी मजबूत केली होती. पण, पवार माढ्यातून निवडणुक लढवणार की नाही, या संभ्रमावरून मोहिते पाटलांचे कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

सोशल मीडीयावर पवारांच्या भूमिकेवर प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे जनतेतून पवारांकडून दिले गेलेल्या आश्वासनाची पूर्ती न केल्याने “स्वप्नात दिलेले वचन सत्यात पूर्ण केले तो राजा हरिश्चंद्र तर, सत्यात दिलेले वचन स्वप्नातही पुर्ण करत नाही तो शरदचंद्र” असे जनतेतून म्हणले जाऊ लागले आहे. त्यामुळे माढ्यात जनतेचा रोष पत्करून आणि मोहिते पाटीलांच्या कार्यकर्त्यांना डावलून उभे राहणार की, फक्त उमेदवारी बाबत गुगलीच ठरणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

59 Views
कृपया शेअर करा
Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close