अहमदनगरताज्या घडामोडीरणधुमाळी

परिवहन खात्याचा गजब कारभार लाखो तरूणांवर बेरोजगारीचे सावट

गजानन कायंदे, ( देऊळगाव माही ) – महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरूण सध्या नौकरीच्या शोधात वनवन भटकत आहेत. त्यातच शासकीय नौकरी म्हटले की जरा तरूणांमध्ये जास्तच उत्साह असतो. महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाने नुकतीच महाराष्ट्रात भरतीसाठी अधिसूचना जारी केलेली आहे. त्यात चालक वाहक या जागेसाठी महाराष्ट्रतून अर्ज मागविण्यात येत आहे. परंतु या भरतीमागील परीस्थिती जरा वेगळी आहे, कारण परीवहन महामंडळाने जे भरतीचे निकष लावले आहेत. ते सरळसरळ अन्यायकारक असुन लाखो तरूण बेरोजगार होणार आहेत.

यापुर्वी जी भरती प्रक्रिया निघायची त्या वेळीला वाहक पदासाठी हेवी लायसन्सची अट नव्हती. परंतु कोणत्याही प्रकारची तरूणांना पूर्वसुचना देता अत्यंत जाचक अटी या भरती प्रक्रियेत दिलेल्या आहे. आता प्रश्न हा आहे की, ज्या तरूणांकडे फक्त वाहकाचे लायसन आहे. त्या तरूणांनी नेमक करायच तरी काय?. असा सवाल महाराष्ट्रातील लाखो तरुणांसमोर निर्माण झाला आहे. या सर्व प्रकाराकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि परीवहन मंत्री लक्ष देतील का असा प्रश्न महाराष्ट्रातील बेरोजगार आणि परीवहन खात्यामध्ये नोकरीसाठी इच्छूक असणा-या उमेदवारांनी केला आहे.

लवकरात लवकर ही जाचक अट रद्द करून तरूणांना न्याय द्यावा अशी मागणी या भरतीसाठी प्रक्रियेसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी केली आहे. जाचक अट रद्द न केल्यास परीवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या शासकीय निवास्थानासमोर महाराष्ट्रातील तरूणांना घेऊन तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शंकर कायंदे यांनी दिला आहे.

70 Views
कृपया शेअर करा
Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close