ताज्या घडामोडीपालघरपुणेरणधुमाळी

भाजपकडून पवारांविरोधात माढ्यात फिल्डींग

समाधान वाघमारे ( विशेष प्रतिनिधी माढा ) – शरद पवार यांच्या लोकसभा उमेदवारीची उत्सुकता सर्वांनाच लागली असताना माढ्यात शरद पवार उमेदवारी निश्चित झाल्यावर भाजपकडून माढ्यात पवार यांना घेरण्यास भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. असे विश्वसनीय भाजपच्या गोटातून माहीती देण्यात आली आहे.

भाजप बारामतीत उमेदवार देऊन
पवारांच्या होमपिचवरच पवारांना खेळवायचे आणि माढ्यातून शरद पवार उभे राहील्यास माढ्यात पूर्ण ताकतीने उतरायचे व पवारांना “पॅक” करणं अशी भाजप कडून रणनिती आखण्यात येईल. जेणे करून पवारांचे पूर्ण लक्ष माढा आणि बारामतीतच राहील अशी
खेळी भाजप कडून खेळली जाईल.

बारामती भाजपला जिंकणे सोपे नसले तरी माढ्यात शरद पवारांचा पराभव करू असा विश्वास भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांना वाटू लागला आहे. शरद पवार यांना माढ्यातून पराभूत केले तर येणा-या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी व पश्चिम महाराष्ट्रावर पकड मजबूत करण्यासाठी शरद पवारांच्या विरोधात माढ्यासाठी केंद्रीय पातळीवरील व राज्यस्तरावर हालचाली चालू झाल्या आहेत.

भाजप कडून उमेदवारी कोणाला हे अद्याप स्पष्ट नसले तरी सहकार मंत्री सुभाष देशमुख तर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. भाजप कडून कोणता बडा नेता गळाला लागतो का याची चाचपणी केली जात आहे.संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभेसाठी इछूक असल्याचे जाहीर केले आहे. माढा मतदारसंघातील परिस्थितीचा फायदा भाजपला होईल असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना वाटतं आहे.

63 Views
कृपया शेअर करा
Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close