पुणेमहाराष्ट्र

पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांना निसर्गचित्राची भेट

महाराष्ट्र विश्व न्यूज, ( पुणे ) – वाहतूक नियमांबाबत जनजागृती चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक, वाहतूक शाखेच्या उपयुक्त तेजस्वी सातपुते यांनी पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांना निसर्गचित्र देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी न्यासाचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक म्हणाले, जनजागृती करणे हे काम एकट्या पोलीस यंत्रणेचे नाही. त्यासाठी समाजसेवी संस्था, शिक्षण संस्था देखील पोलिसांची मदत करून महत्वाची भूमिका निभाऊ शकतील, त्यातून आमचे कला महाविद्यालय आहे. त्यामुळे चित्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात पोलिसांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उपक्रम उदघाटन समारंभापुरता मर्यादित न राहता जनजागृती ही एक चळवळ निर्माण व्हायला हवी. म्हणजे एक ना एक दिवस आपली मोहीम नक्की यशस्वी होईल.

पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणाले, अपघाताचे प्रमाण घटविण्याकरीता आम्ही सतत कार्यरत असतो. अशा प्रकारचे जनजागृतीचे उपक्रम राबविल्यामुळे निश्चितच अपघातांचे प्रमाण घटवण्यात खूप फायदा होईल. यावेळी त्यांनी मुलांच्या चित्रकृतींचेही मनापासून कौतुक केले. 

67 Views
कृपया शेअर करा
Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close