ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

करमाळा माढा विधानसभेसाठी प्रभाकर देशमुख यांचे नाव चर्चेत?

समाधान वाघमारे, (विशेष प्रतिनिधी)- माढासाठी इच्छुक असणारे माजी सनदी आधिकारी प्रभाकर देशमुख शरद पवारांच्या उमेदवारी मुळे मागे पडले. पण, त्यांना करमाळा किंवा माढा विधानसभेसाठी त्यांचा विचार केला जाईल असे अश्वासन राष्ट्रवादी कडून देण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

मुंबईत रामराजे निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघा बाबतच्या बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थिती दाखवून माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. जर शरद पवार माढ्यातून उभे राहीले, तर शिंदे राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे . शिंदे यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत बैठकीला दांडी मारली.

भाजपकडून संजय शिंदे खासदारकीला उभे राहिल्यास आपण संजय शिंदे याच्यां बाजूने प्रचार करीन असे सांगत आपली भूमिका जाहीर केली होती . प्रभाकर देशमुख यांच्या चर्चेने शिंदे हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे कळते आहे.

करमाळ्यात रश्मी बागल यांच्या समोर सध्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांचे तगडे आव्हान आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे रश्मी बागल यांना मोहिते पाटील तसेच त्यांच्या समर्थकांचे कीती सहकार्य लाभते यावर बागल यांचे भवितव्य अवलंबून आहे. करमाळ्यात राष्ट्रवादी डेजरझोन मध्ये दिसत असल्याने आणि गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी शरद पवार यांच्या कडून प्रभाकर देशमुख यांचे ही नाव चर्चेत आहेत. अद्याप विधानसभेसाठी नुसती चर्चा असली तरी लोकसभेनंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.

43 Views
कृपया शेअर करा
Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close