कोल्हापूरताज्या घडामोडीमहाराष्ट्ररणधुमाळी

पवार माढ्यातुन उभे राहील्यास तुल्यबळ उमेदवार देऊन पराभव करू – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र विश्व न्यूज, ( सातारा ) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या कार्यकर्त्यांबाबत कॉन्फीडन्सच राहिलेला नाही. त्यामुळे ते थेट घरातच उमेदवारी देत आहेत. ते माढ्यातुन उभे राहणार असतील तर आमच्याकडुनही तुल्यबळ उमेदवार दिला जाईल, व पवारांचा माढ्यात पराभव करू अशी माहिती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कऱ्हाड येथे दिली.

भाजप व शिवसेना युतीचा निर्णय आठवड्यात होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. सातारा, सांगली, कोल्हापुर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील क्लस्टरमधील शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीसाठी मंत्री पाटील शनिवारी कऱ्हाड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लोकसभेची उमेदवारी ह्या वयात त्यांना झेपणार नाही असा मी सल्ला दिला होता. मात्र त्यांना तो आवडला नाही. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा कॅन्फीडन्सच राहिलेला नाही. त्यामुळे ते थेट घरातच उमेदवारी देत आहेत.

45 Views
कृपया शेअर करा
Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close