ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रसोलापुर

पवार यांची २००९ ची मावळत्या सूर्याची शपथ सांगोल्यातील जनतेत नाराजी

समाधान वाघमारे ( विशेष प्रतिनिधी ) – पवार यांनी सांगोला तालुक्यात दुष्काळ परीषद घेऊन परत एकदा माढा लोकसभा लढवणार असल्याचे सांगितले, पण २००९ ला शरद पवार उभे राहीले असता प्रचार काळात मावळत्या सूर्याची शपथ घेऊन कायम दुष्काळी असलेल्या तालुक्यात शेतीच्या पाणी प्रश्न कायमचा मिटवू अशी शपथ घेतलेली होती. निवडून आल्यानंतर पवार केंद्रात कृषीमंत्री होते तरी सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत. त्यामुळे सांगोला तालुक्यातील जनतेत पवारांच्या विषयी रोष आहे. जो व्यक्ती मावळत्या सूर्याची शपथ घेऊन पोकळ अश्वासने देतो. त्यांच्या वर कसा विश्वास ठेऊ असा सवाल जनतेतून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

तालुक्याचा शेती पाणी प्रश्न स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित आहे. तर गेल्या ५५ वर्षा पासून शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांच्याकडे एकहाती सत्ता
असतना सुद्धा ते तालुक्यातील पाणी प्रश्न पूर्ण सोडवू शकले नाहीत. त्यांनी म्हैसाळचे पाणी तालुक्यात आणण्याचे प्रयत्न केले पण ते अपूरे पडले.

२०१४ पूर्वी शरद पवार हे केंद्रात व राज्यात सत्तेवर असताना सुद्धा पवार हे सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्न कायमचा सोडवू शकले नाहीत. पाणी कोण आणणार आमदार की खासदार अशा श्रेयवादी भूमिके मुळे सांगोला तालुक्याला पाणी मिळू शकले नाही. यंदा पवार माढ्यातून उभे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याने मावळत्या सूर्याची शपथ ही सांगोला तालुक्यातील जनतेत चर्चेचा विषय झाला आहे. २००९ ला पाणी मिळणार या आशेने सांगोल्यातील जनतेने पवारांना मताधिक्य दिले होते. पण, या वेळी तालुक्यातील जनता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

45 Views
कृपया शेअर करा
Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close