मनोरंजन

नांदेड आयकॉन रितु भुरेवार ठरल्या विजेत्या !

(MNEx.Team नांदेड़)

नांदेड आयकॉन रितु भुरेवार यांना यशस्वीनी पुरस्कार देवून त्यांचा गौरव तुळजामाता महिला विकास मंडळ संचालित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओंकारा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित नांदेेड आयकॉन स्पर्धेत सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये नांदेड आयकॉन स्पर्धेत प्रथम रितु भुरेवार या विजेत्या ठरल्या तसेच समाजामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा यशस्वीनी पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.
नांदेड आयकॉन स्पर्धेचे आयोजन दि.25 मार्च रोजी कुसुम सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ.पुनम पवार, सौ.आशा शिंदे, डॉ.सौ.रेखाताई चव्हाण, सौ.कृष्णा मंगनाळे, सौ.पांपटवार, सौ.प्रा.ललिता शिंदे, सौ.ज्योती देशमुख, सौ.वनिता देवसरकर, ओंकारा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अ‍ॅड.सौ.कल्पना पाटील डोंगळीकर, उपाध्यक्षा सौ.मनोरमा शेट्टे, सचिव सौ.लता मद्रेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड आयकॉन स्पर्धेमध्ये 38 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक रितु भुरेवार यांना रोख 10 हजार रूपये व मुकुट, द्वितीय क्रमांक रेखा धुत यांना 7 हजार रूपये, तीसरा क्रमांक निभीषा राठोड यांना 5 हजार रूपये बक्षिस देण्यात आले.
या स्पर्धेत विविध कलागुणांचे सादरीकरण महिलांनी सादर केले. या स्पर्धेचे परिषक म्हणून भरत जेठवानी, सपना भागवत, मेघवानी, संगीता ठाणीवाला यांनी काम पाहिले. याच कार्यक्रमामध्ये नांदेड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांना यशस्वीनी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यामध्ये सहकार क्षेत्रात सौ.सविता मारोती कंठेवाड, सामाजिक क्षेत्रात सौ.राजर्षी राजेंद्र हुरणे, वैद्यकीय डॉ.सौ.रचिता बिडवई, शैक्षणिक सौ.जयश्री कामाजी पवार, शैक्षणिक सौ.नयनजीतकौर शेरसिंघ पुजारी, प्रशासकीय सौ.किर्ती सुस्तुरवार, उद्योग सौ.शोभा सुरेश वाडीकर, सामाजिक सौ.श्रध्दा सुशिल चव्हाण, शैक्षणिक सौ.स्वाती श्रीकांत बच्चेवार यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
या प्रसंगी पुनम पवार यांनी नांदेडमध्ये अशा स्पर्धा घेतल्या आहेत ही बाब चांगली असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच आशा शिंदे यांनी या स्पर्धेचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजिका व अध्यक्षा अ‍ॅड.कल्पना डोंगळीकर यांनी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता नांदेड आयकॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी सौ.सिंधू देशमुख, नंदा किरजवळेकर, राजश्री गादेवार, संजिवनी वाघमारे, प्रेमला गोपुलवाड, विद्या कदम, सविता कट्टी, प्रा.ज्योती बन आदी महिलांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.दिपाली रॅपनवाड यांनी केले. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने युवती व महिला उपस्थित होत्या.

68 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close