माहूर येथील ग्रामीण रुग्णलयात दि.31 मे रोजी तंबाखू निषेध दिन

नांदेड / माहूर,दि. ०१ :- जागतीक तंबाखू विरोधी दिना निमित्त माहूर येथील ग्रामीण रुग्णलयात दि.31 मे रोजी तंबाखू निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे मानवी शरीरावर त्याचे होणारे दुष्परिणाम व कर्क रोगासारख्या घातक आजाराचे आपण कसे बळी पड़त आहो याचे वास्तव मांडले. आजाराच्या बाबतीत जागतीक क्रमवारीत भारताचा आज प्रथम क्रमांक असल्याचे सांगून या पदार्थाचे सेवन करू नये असा सल्ला दिला. तसेच 31 मे ते 30 जुन 2019 पर्यंत ग्रामीण रुग्णालय माहूर येथे राबविण्यात येणाऱ्या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा 30 वर्षा वरील सर्वानीच लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलतांना डॉ.भोसले म्हणाले की, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनाने कर्क रोगासह तोंड उघडता न येणे,तोंडाची दुर्गंधी येणे,तोंडात लाल व पांढरा चट्टा पड़ने,तोंडात जखम झाल्यास ती पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ टिकून राहणे,सिगारेट व विडी ओढल्याने फुफुसाचे आजार अधिक बळावणे, गर्भवती महीलेने तंबाखू सेवन केल्याने बाळाची वाढ मंदावणे शिवाय शरीराच्या अन्य अवयावर त्याचा अपाय होणे असे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे घातक परिणाम होत असल्याने आशा वस्तूच्या व्यसना पासून सर्वानीच चार हात लांब राहणे सुदृढ़ आरोग्यासाठी गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
31 मे हा जागतीक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळण्यात येते.जागतीक आरोग्य संघटनेने यावर्षी तंबाखू आणि फुफुसा संबधीत आरोग्या वरील दुष्परिणाम ही संकल्पना पुढे आणली आहे. ग्रामीण रूग्णालयातील सर्व कर्मचा-यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याची शपथ घेवून संपूर्ण माहूर तालुका तंबाखू मुक्त करण्याचा मानस व्यक्त व्यक्त केला.यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ.जाधव मॅडम,एन.सी.डी.चे मेडिकल ऑफिसर डॉ.भबुतकर,समुपदेशक किरण चीरडे व ग्रामीण रूग्णालयातील अन्य कर्मचारी उपस्थित होते.