World

कारगील विजयाची 20 वर्ष

नवी दिल्ली , दि. 14 :- ऑपरेशन विजय अर्थात कारगील युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला यावर्षी 20 वर्ष होत आहेत. कारगील युद्ध म्हणजे राजकीय, लष्करी आणि मुत्सद्देगिरीची गाथा आहे. कारगील युद्धातला विजय, आपला देश मोठ्या अभिमानाने, गौरवाने साजरा करणार आहे.

धोरणात्मक आणि व्युहात्मक रणनीती हे युद्ध कारगील-सियाचेन भागापुरते मर्यादित ठेवण्याचा संयम बाळगण्याचे राष्ट्रीय धोरण आणि युद्ध हाताळण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांचा जलदगतीने अचूकपणे केलेला वापर हे या युद्धांचे महत्वाचे पैलू. आपल्या जवानांनी दाखवलेले अतुलनीय शौर्य राष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल.

आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि युवकांसह जनतेच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्याचा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

कारगील विजय दिनानिमित्त 25-27 जुलै दरम्यान द्रास आणि नवी दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. कारगील विजय दिनानिमित्त लडाखमध्ये ‘एक दौड शहीदों के नाम’ आयोजित करण्यात येणार असून या क्षेत्रातल्या अति दुर्गम भागातले नागरिक, माजी सैनिक यात सहभागी होतील.

89 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close