Foods

शीर खुरमा कार्यक्रम केला मंदीरात साजरा…!!

सर्वधर्म समभाव चा संदेश दिला.

रफीक कनोजे, मुकूटबन.

यवतमाळ / झरी , दि. १६ :- मुस्लीम बांधवांचा पवीत्र रमजान महीना संपला. सर्व मुस्लीम बांधवांनी ईदही साजरी केली. मुस्लीम बांधवांनी व ईतर धर्मियांनी सुध्दा एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईदच्या दिवशी दूध, खवा, साखर व सुकामेवा एकत्र करून शीर खुरमा बनवतात व त्याचा स्वाद मित्रमंडळीना बोलावून देतात. मुस्लिम समाजात शीर खुरमाचा कार्यक्रम जवळपास एक महिना चालतो व तो अजूनही सुरू आहे. अश्याच प्रकारातून मजिद भाई ने शीर खुरमा कार्यक्रम केला मारोती मंदीराच्या ओट्यावर साजरा केला.

पांढरकवडा वरून मजीदभाई च्या टाटा मॅजिक गाडीने दररोज १० ते १२ कर्मचारी रोज वणीला प्रवास करतात. त्यापैकी २ कर्मचारी मारेगाव येथे उतरतात व मारेगाव येथून दोघे जण चढतात हा त्यांचा दररोज प्रवासाचा नित्यक्रम आहे. दरवर्षी मजिदभाई ईद निमित्य शीर खुरमा कार्यक्रम आयोजित करतात. ह्या वेळेस हा कार्यक्रम पांढरकवडा वरून ११ किमी अंतरावरील नागपूर रोड वाई फाटा वरील हनुमान मंदिराच्या ओट्यावर ता. १५ सकाळी १० वाजता आयोजीत करण्यात आला सर्वांना भरपूर खीर खुरमा देण्यात आला. प्लास्टिकच्या वाटी चमच्याने सर्वांनी आस्वाद घेतला . त्यांनतर रिकाम्या वाट्या व चमचे जमा करून मजीद ने जवळच्या पिशवीत टाकुन दुसरीकडे फेकून दिले. ह्यातून सर्वधर्म समभाव चा संदेश दिला. ह्यावेळेस राजूभाऊ मोत्तेमवार, प्रसाद नावलेकर, संजय खडसे, अनिरुद्ध बडवे , गजानन पंधरे, जीवन चौधरी, राजेंद्र खोंडे, रामदास निकोडे, दत्ता नव्हाते, भीमराव राजगडकर , येस डी भगत , पी एस जाधव, गजानन कडुकर , गजानन घनाटे आदीनी मजीद भाईला ईद च्या शुभेच्या दिल्या.

120 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close