Life Style

बांगड्याच्या व्यवसायातुन लाखोंची उलाढाल…….

पोलीसवाला न्यूज नेटवर्क

फॅन्सी बांगडयांचे आकर्षण. पारंपरिक बांगड्या फॅन्सी बांगडयांना महिलांची पहेली पसंती..

खास पसंती आहे. यात मेटल. प्लास्टिक. सिरॅमिक घटकांचा वापर करून बांगड्या बनविल्या जातात. फॅन्सी बांगडयांमध्ये रंगसंगती करून केलेले सेट तयार मिळतात. प्रत्येक सेटमध्ये असलेल्या बांगडयांची संख्या व त्यावरील त्यानुसार सेटची कींमत ठरते एकसेट 60 रुपयांपासून 500रूपायांपर्यत मिळतो. सेट तयार करतांना काचेच्या प्लेन बांगडयांसहा मेटलच्या बांगड्या. स्टोन टिकल्या. लेस यांची सजावट केलेल्या बांगडयाचाही वापर होतो. लाखेच्या बांगडयांचा सेट देखील फॅशनचाच भाग आहे. या शिवाय पंजाबी. चुडा. गुजराती चूडा विक्रीला उपलब्ध असुन ग्राहकांतुन या सेटची खरेदी केली जाते……

दागिना हा प्रत्येक स्त्रीमनाचा हळवा कोपरा. त्यातही बांगड्या हा सौभाग्यलंकार असल्याने प्रत्येक महिलेला हा दागिना घालुन मिरवणे म्हणजे हा स्त्रीत्वाचा अभिमान वाटतो. खणखण असा आवाज असलेल्या काचेच्या बांगडयांना यातही आगळावेगळा स्थान आहे. फॅशनच्या बदलत्या दुनियेत बांगड्याच्या स्वरूपात आमुलाग्र बदल झाला असला तरी महिलांचे बांगड्यांवरील प्रेम मात्र सूतभरही कमी झालेले नाही. लग्नसराईत शहरा सहा ग्रामीण भागात लागलेली बांगडयांचे दुकाने व तेथील गर्दी हेच सिद्ध करतात. मात्र उन्हाळ्यातच लग्नसराईच्या काळात लाखोरूपयांचा व्यवसाय होत असल्याचे ठोक विक्रेता सांगत असुन मात्र चित्र पहाव्यास मिळत आहे.
आज सहज कुठल्याही मुलीच्या किंवा महिलांच्या हाताकडे लक्ष दिल्यास हातभर किंवा डझनभर बांगड्या घालुन असल्याचे चित्र सहसा दिसुन येत नाही. त्यामुळे मग बांगडयांचा व्यवसाय तेजीत कसा. असा प्रश्न पडणे साहाजिक आहे. परंतू कुठल्याही पारंपरिक सभारंभात विशेष करून लग्न समारंभात कुठल्याही महिलेचे बांगडीशिवाय पान हालत नसल्याचे निदर्शनास येते.
पुर्वी बांगडी हा प्रकार केवळ सौभाग्याच लेणं या कक्षेतच मर्यादित होता. गावागावातून खुप सारि दुकाने नव्हती. महिला काचेच्या बांगड्या पुरवून घालत असत. बांगड्या भरण्यासाठी वाट पहावी लागत असे एरव्ही कुणाच्याहि हात हातात न देणाच्या महिला कासाराच्या हातात मात्र विश्वासाने आपला हात द्यायचा कासारहि सहज गप्पा करीत डझनभर बांगड्या हातात सहज भरायचा एखाद्या महिलेचा हात मोठा असल्यास बांगड्या भरताना कसरत तर असायचीच पण भांगडी तुटून हाताला लागली की जखम व्हायचीही भीती असायची खरं तर कासार ही जमात भांडे विकणारी मुस्लिम लोक बांगड्या विकण्याचा व भरण्याचा व्यवसाय करायचे. भांडे विकणारे हि तसेच गावभर फिरत असल्याने त्यांना हळुहळु कासार म्हणणे सुरू झाले ते कायमचेच नंतर या व्यवसायात इतर जातीच्या लोकांचाही शिरकाव झाला.
आणि सरसकट त्यांनाही कासार नाव चिकटले ते कायमचे. परंतु आता गावोगावी दुकानांमध्ये वेगवेगळ्या बांगड्या सहज उपलब्ध असतात कासारची वाट पाहणे बंद झाले. केवळ लग्नसमारंभत मान म्हणून बांगड्या भरुन देत असलेल्यांना एक परंपरा म्हणून बोलविले जाते. एरव्ही दुकानात जाऊन हव्या त्या.. रंगाच्या बांगड्या विकत घेण्यावर महिला भर देत आहेत. पारंपरिक कासार व्यवसायाला घरघर लागली असली तरी नव्या रूपाने यात शिरलेल्या व्यवसायीकांमुळे हा व्यवसाय सध्या तेजीत दिसत आहे.
नवा रोजगार यामुळे निर्माण झाला आहे. पूर्वी प्रमाणे काचेच्या बांगडयांना अधिक पसंती असली तरी मेटलच्या फॅन्सी बांगड्या घालण्याचा टेंृड वाढला आहे. कारण काचेच्या बांगडयांमध्ये लाल. हिरवा. पिवळा. केशरी असे काहीच ठळक रंग असतात. पण फॅन्सी बांगडयांमध्ये मात्र तब्बल 40 वेगवेगळ्या रंग बघायला मिळत असल्याने त्यांची मागणी जास्त आहे.

111 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close