Home सातारा रमाईचा त्याग आणि कष्टामुळे आपले जीवन समृद्ध आहे –  बाळासाहेब कांबळे

रमाईचा त्याग आणि कष्टामुळे आपले जीवन समृद्ध आहे –  बाळासाहेब कांबळे

269

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. ०९ :- अनंत हाल-अपेष्टा व दुःख यांना सामोरे जातात महा नायकाची सावली बनलेल्या रमाईचे त्यागमय आणि कष्टप्रद जीवन यामुळेच आज आपण समृद्ध जीवनाचा उपभोग घेत आहोत असे प्रतिपादन लेखक बाळासाहेब कांबळे यांनी केले .

रमाई एकता विचार मंच आटपाडी यांच्यावतीने आयोजित ‘रमाई जयंतीनिमित्त’ ते बोलत होते .मंगल गायकवाड ,सुरेखा लोंढे ,कविता खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
माता रमाई च्या 123 व्या जयंतीनिमित्त संयोजकांच्या वतीने ‘रमाई चरित्राच्या वाचन सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले होते यावेळी लेखक बाळासाहेब कांबळे लिखित रमाई चरित्राचे अनिशा जावीर यांनी क्रमशा वाचन करून रमाईचे जीवन कार्य समजावून दिले. या उपक्रमामुळे आमच्या जीवनाला नवी प्रेरणा मिळाल्याचे ,सानिका खरात, सुवर्णा वाघमारे ,सिंधुताई ऐवळे, पारुबाई खरात व अनेक महिलांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
पुढे लेखक बाळासाहेब कांबळे म्हणाले “रमाईच्या आयुष्यातील कष्ट ,त्याग आणि समर्पण यामुळे डॉक्टर बाबासाहेब यांचे परदेशी उच्चशिक्षण आणि समाज कार्य पूर्ण होऊ शकले .त्यामुळेच आज आपण खरी समता आणि बंधुता अनुभवत आहोत. या त्यागाचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे .”
प्राध्यापिका सुष्मिता मोटे यांनी प्रस्ताविक करुन या उद्बोधन उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला .कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कुंदा लोखंडे कांबळे यांनी रमाई चे कार्य आणि कर्तृत्व समजावून घेताना महिलांनी उन्नतीसाठी बुद्धिप्रामाण्यवाद जपला पाहिजे ,याविषयी मार्गदर्शन केले .पुनम ऐवळे, रविकिरण जावीर ,मनीषा ऐवळे ,दीपक खरात ,राजेंद्र खरात, अश्विनी ऐवळे, श्रद्धा ढवळे इत्यादींनी मनोगत व्यक्त करून रमाईला अभिवादन केले .कविता घाडगे यांनी रमाई माऊलीचे सुमधुर गीत सादर केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रणजीत ऐवळे प्रा .बालाजी वाघमोडे, राजेंद्र मोटे ,श्रद्धा ऐवळे यांनी परिश्रम घेतले. माया वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले.