ताज्या घडामोडी

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी बायकोने विष घालून मारलेल्या छगनलालचा बाटलीबंद व्हिसेरा अलगद पिशवीच्या तळाशी ठेवला

पोलीसवाला न्यूज नेटवर्क

गेल्या वर्षी नवऱ्यानं रानात मूडदा पाडल्यावर मरून पडलेल्या चिंगीची सुकलेली कुजकट वासाची हाड अन कवटी पिशवीत भरून घेतली.
दारूच्या नशेत गाडी चालवताना दोघांना चिरडून टाकणाऱ्या समशेर खानचे रक्ताचे नमुने असलेल्या दोन छोट्या कुप्या ब्यागच्या वरच्या कप्प्यात टाकल्या. गावठी बनावटीची दारू असलेल्या सीलबंद बाटल्या नाजूक हाताने ब्यागेच्या एका कोपऱ्यात अलगद ठेवल्या. चोरी करताना मालकाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जग्याने वापरलेला जप्त चाकू कागदात बांधलाय तो हि जपून ब्यागेत ठेवला.
त्या अनोळखी प्रेताच्या डी. एन.ए. तपासणीसाठी त्याच काढलेलं मांडीच हाड, दात, नख वेगवेगळं बांधलय ते हि ब्यागेत घेतलं. सगळ्या कागदां वरून एकदा भरभर एक नजर फिरवली. सह्या शिक्के तपासले.! सगळे आवश्यक कागद अन लिफाफे गोळा करून एका पिशवीत घेतले. या सगळ्या किळसवाण्या घाणेरड्या चीज वस्तू ब्यागेत एकत्र जमवून त्या ब्यागची चैन व्यवस्थित लावून अलगद पाठीवर टांगली.
क्षणभर डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला…
अन आज पुन्हा हवालदार आपलं मन मारून त्याच कर्तव्य निष्ठेने मुंबई / पुण्याकडे मार्गस्थ झालाय. ते सगळं तपासा साठी गोळा केलेलं मानवतेला काळींबा फासनार हिंस्त्र अन गलीच्छ धन व दुसऱ्याच पाप खांद्यावर घेऊन प्रयोगशाळेत जमा करण्यासाठी.!
.. आणि त्याच बॅगेच्या पुढच्या कप्प्यात वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या चार चपात्या लोणचे आणी पहाटे ऊठुन बायकोने बनवलेली भेंडयाची भाजी असलेली प्लॅस्टिकची कॅरीबॅग ठेवली आणि मग मार्गस्थ झाला. . . अशी असते जिंदगी अन कुणीतरी सभ्य ग्रस्थ म्हणतो पोलीस काहीच काम करत नाहीत.

950 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close