प्रशासन

भ्रष्टाचारी रोजगार सेवकास तात्काळ निलंबित करण्याची मागणी….!!

ग्रामपंचायत चहांद येथील प्रकार….!!

वडकी / प्रतिनिधी

यवतमाळ , दि. ०७ :- राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा चहांद येथील ग्रामरोजगार सेवकाची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चेच्या वतीने करण्यात आली आहे.
राळेगाव तालुक्यात अत्यंत वादग्रस्त असलेली मौजा चहांद येथील ग्रामपंचायतचा भ्रष्टाचाराचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
येथील ग्रामरोजगार सेवकांचा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर संबंधित विभागाने त्यांना दोषी ठरविले होते. व तसा अहवाल ग्रामपंचायतला देण्यात आला होता. तरी पण त्याला निलंबित न करता सचिव व वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालीत आहे. येत्या पंधरा दिवसांत निलंबित न केल्यास व तसे नविन रोजगार सेवक न नेमल्यास भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निखील रा. शेळके ह्यांनी दिला आहे.

52 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close