बुलढाणा

लोणार ते तांबोळा रोडवर टाटा झेक्ट गाडी झाडावर आदळल्याने एक ठार एक गंभीर

सचिन गोलेचछा

लोणार , दि. 07 :- लोणार ते तांबोळा रोडवर लोणार तांबोळा येथे भरधाव वेगाने जात असताना कारची धडक झाडाला लागल्याने 35 वर्षीय महीला ठार तर चालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान घडली.
लोणार येथील अनिल रामराव मापारी यांच्या मालकीची टाटा झेक्ट कार क्रं. एम एच 28 ए झेड 2645 चा चालक भागवत पाटीलबुवा दुधमोगरे रा.सरस्वती हा आपली पत्नी सौ. शिला भागवत दुधमोगरे ही शेतात काम करित असताना तिला गाडीत घेउन बिबी कडे भरधाव जात असताना गाडीवरील नियत्रण सुटल्याने गाडी शेतात असलेल्या झाडावर आदळली अपघात इतका भयानक झाला की गाडी चे दोन दुकडे झाले यामध्ये सौ. शिला भागवत दुधमोगरे वय 35 ही घटनास्थळीच ठार झाली तर चालक भागवत हा गंभीररित्या जखमी झाला जखमीस तांबोळा गावातील नागरिकानी 108 ला बोलावुन लोणार ग्रामीण रूग्नालयात भरती केले मात्र भागवत यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे यावेळी ग्रामीण रूग्नालयातील वैदयकीय अधिक्षक शहा यांनी प्राथमिक उपचार केला सदर अपघात भयानक झाला असुन गाडीचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन वृत्त लिहेपर्यत कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

167 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close