वर्धा

लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाच्या चिंतन बैठकीचे आयोजन

सौ पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०८ :- लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवार चारूलता ताई टोकस यांनी वर्धा येथील सदभावना काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात चिंतन बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीमध्ये बोलताना चारुलता ताई राव टोकस म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत पराभव होणे अपेक्षित नव्हते. पंरतु झालेला पराभव मान्य करीत पक्षाच्या कार्यकर्तानी खचून न जाता पुन्हा जोमाने नविन उर्जा घेवून विधानसभेच्या निवडणूका लढण्याकरीता सज्ज रहाण्याचे आवाहन केले.
बैठकीला जिल्हा अध्यक्ष मनोज चादूरकर, माजी जिल्हा अध्यक्ष विजयसिगं ठाकूर, रामभाऊ सातव, शेखर शेंडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे , महिला आघाडी अध्यक्षा हेमलता मेघे,देवळी तालुका अध्यक्ष मोरेशवर खोडके यांचे सह वर्धा तालुका,पुलगाव शहर वर्धा शहर अध्यक्ष उपस्थित होते.
पुढे बोलतांना ताई म्हणाल्या की, मी लोकसभेची निवडणूक लढविली त्यावेळी पुरेसा वेळ नव्हता, कमेट्या नव्ह्त्या इतर सेल कमेट्या सुद्धा नव्ह्त्या या गोष्टी येणार्या विधानसभा निवडणूकीत घडू नये.याकरिता लवकरच कमेट्या करणार असल्याचे सांगीतले. कार्यकर्त्यांनी पूर्ण वेळ पक्षाला देवून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले.
या पुढे आपण पक्ष बांधनी करीता पूर्ण वेळ देवून काँग्रेस पक्षाला मजबूत करणार असल्याचे सांगीतले. येत्या काळात पक्षाचे संघटन बळकट करणे, सल्लागार समिती, संशोधन समिती, प्रचार समित्या, तालुका कमेट्या तयार करणार असून कार्यकर्त्यांनी आपसी हेवेदावे विसरून जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. याला जिरव त्याला जिरव हे बंद करून कोणतीही गटबाजी न ठेवता काँग्रेस पक्ष जोमाने पुढे उभा राहील असी ग्वाही दिली.
या अगोदर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली.
बैठकीला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

88 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close