वर्धा

संकटकालीन काळात मदतीसाठी तत्पर असणार नेत्रुत्व प्रहारचे रुग्णमित्र – गजुभाऊ कुबडे

पोलीसवाला न्यूज नेटवर्क

हिंगणघाट तालुक्यातील एका टोकावर असणारे कानगाव येथील मोलमजुरी करून जगणारा पिठाडे परिवार परिवारातील सौ. सुजाता पिठाडे या पोटाचा आजाराने त्रस्त होत्या त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे भरती केले असता तेथील डॉक्टर यांनी पोटात गोळा असून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला त्रास अति असल्याने पिठाडे परिवाराने होकार दिला उदारवाडी करून सात आठ हजार रुपये गोळा केले ते सात आठ हजार रुपये औषधी व बाहेर कामातच खर्च झाले दिनांक 23 जून ला सौ. सुजाता पिठाडे यांना दवाखान्यातून सुट्टी झाली परंतु त्यांचा ऑपरेशन व दवाखान्याचे बिल 16000 रुपये निघाले आता पेशंटला सुट्टी तर झाली परंतु 16000 हजार रुपये बिल भरायचे कुठून हा प्रश्न पिठाडे परिवाराला पडला आता पैसे उदार कोण देईल उदार पैसे देणाऱ्या लोकांन कडून आधीच उदार पैसे घेतले असल्याने मोठा प्रश्न पडला तितक्याच पिठाडे पेशंट जवळच हिंगणघाट येथील एक भरती असलेल्या पेशंट नी त्यांना हिंगणघाट येथील सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव धाऊन जाणाऱ्या प्रहारचे रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना मदतीसाठी म्हणुन सांगितले पिठाडे परिवारानि रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली 23 तारखेला रविवार असल्याने रुग्णमित्र- गजुभाऊनी पिठाडे परिवाराला 24 तारखेला कॉल करण्यास सांगितला 24 तारखेला रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी कस्तुरबा रुग्णालयातील आर्थिक दुर्बल योजने अंतर्गत आज सर्व कागतपत्र तयार करून व रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सौ. सुजाता पिठाडे यांचे 16000 हजार रुपयाचे बिल पूर्ण 100% माफ केले या वेळी संपूर्ण पिठाडे परिवारानी रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडेचे आभार मानले आज परत रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे हे एका गरजू परिवाराचा पाठीमागे खंबीर पणे उभे राहल्याने आज एक गरीब परिवार कर्जबाजारी होण्यापासून वाचला.

प्रत्तेक गावात जर रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे सारखे निस्वार्थी पणाने काम करणारे कार्यकर्ते जर निर्माण झाले तर खरच सामान्य माणुसाला प्रत्तेक ठिकाणी योग्य न्याय मिळण्यास मदत होईल म्हणुन आज रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे हे काळाची गरज आहे हि सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

115 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close