पर्यावरण

खुनी नदीतून वाहते हिरवे पाणी…!!

रफीक कनोजे, मुकुटबन.

यवतमाळ / झरी , दि. ०८ :- टाकळी येथील खुनी नदीत अचानक हिरव्या पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने नदी नजीकच्या गाकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याचा रंग हिरवा झाल्याने शंका कुशंकाना पेव फुटले. मात्र ह्या हिरव्या पाण्याने जलचर, मनुष्य, जनावरे मेली नाहीत, हे उल्लेखनीय आहेत.

टाकळी येथील खुनी नदीच्या संपूर्ण पात्रातून हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील अनेक गावातयाच नदीद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने लोकांच्या मनात मोठी दहशतीचे वातावरण निर्माण झालेली आहे. सुरूवातीला या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र काही लोकांनी जाऊन पाहणी केली असता. त्यांना हे पाणी स्वच्छ दिसले, मात्र त्याचा रंग हिरवा झाला होता. टाकळी येथील सरपंच संदीप बुरेवार यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी गावात दवंडी देऊन गावातील पाणीपुरवठा बंद केला व नदी काठावरील त्यांच्या जवळील ग्रामपंचायतच्या सरपंच व मित्रांना याची माहिती देऊन पाणीपुरवठा बंद करण्यास सांगण्यात आले. सध्यास्थितीत गावकऱ्यांना या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. नंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह खुनी नदीवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व आरोग्य विभागाला माहिती दिली. झरी आरोग्य विभागाची चमू आली व पाण्याचा नमुना घेऊन गेले. हा अहवाल मंगळवार पर्यंत मिळू शकतो असे तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी सांगितले.

नदीत शैवाळ वाढत असतात व ते श्र्वासोष्वास द्वारे ऑक्सीजन सोडतात. शैवालाची परिपूर्ण वाढ झाली की ऑक्सीजन वायूचा संपर्क परिपूर्ण वाढ झालेल्या शैवाल सोबत होऊन बॅक्टिरिया निर्माण होतात. त्यामुळे शैवाल व बॅक्टिरीया यांचा संयोग झाल्यामुळे नदीतील पाणी हिरवे झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. तरीपण पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. अहवाला आल्यानंतरच पाणी हिरवे कसे झाले, हे कळू शकेल. अजय जोगदंड, वैद्यकीय अधिकारी मुकुटबन.

57 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close