गुन्हेगारी

एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा हत्या..

पोलीसवाला न्यूज नेटवर्क

अमरावती , दि. ०९ :- अमरावती शहरात आज दुपारच्या सुमारास एकतर्फी प्रेम प्रकरणात एका महाविद्यालयीन तरुणीची भर चौकात हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील काही युवकांनी हत्या करणाऱ्या तरुणाला पकडून राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामधील कवठा बहाळे या गावातील कु. अर्पिता ठाकरे हि अमरावतीच्या महात्मा फुले महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आज दुपारी गावी परत जाण्याकरिता अर्पिता राजापेठ बस स्थानकाकडे जात असताना तुषार मस्करे नामक युवकाने तिचा पाठलाग करून तिला गाठले व तिच्या पोटावर तसेच गळ्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. हि घटना परिसरात असलेल्या काही युवकांनी पाहताच त्यांनी तुषारला पकडले व चांगला चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. गंभीर जखमी झाल्याने अर्पिताला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अर्पिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तुषार मस्करे याचं अर्पितावर गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी प्रेम होतं व तो तिचा महाविद्यालयात जातांना दररोज पाठलाग करीत असे. मात्र अर्पिता त्याला कुठलीच दाद देत नव्हती. तर या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच तुषार विरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. यावेळी तुषारने पोलिसांसमोर आपण अर्पिताला भेटणार नाही अथवा तिची छेड काढणार नाही अशी ग्वाही लेखी स्वरूपात दिली होती. मात्र आज तुषार पुन्हा तिच्या मागे महाविद्यालयात आला व तिच्यावर चाकूने हल्ला करून तिला ठार केले.

139 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close