Home विदर्भ वर्धेच्या जिल्हाधिकारी यांना भिम आर्मी कडून दिले निवेदन.!

वर्धेच्या जिल्हाधिकारी यांना भिम आर्मी कडून दिले निवेदन.!

170

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

तिन चार महिन्यापासून सुरक्षा रक्षकाचे पगार रखडले

वर्धा , दि. १५ :- जिल्हा परिषद येथे सुरक्षा रक्षक म्हणून 6 ते 8 वर्षांपासून काम करीत असून सध्या ठेका हा ms कलोडे security एजन्सी कंपनीकडे असून 3 ते 4 महिन्यापासून पगार न झाल्याने उपासमारीची वेळ आल्यामुळे जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे भिम आर्मी च्या वतिने निवेदन सादर केले आहे.
गेल्या 6 ते 8 वर्षांपासून जिल्हा परिषद येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असून सध्या च्या परिस्थितीत जिल्हा परिषद येथील ठेका *ms कलोडे security एजन्सी* कंपनी कडे असून 23 लोकांचे गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वेतन न झाल्याने उपास मारीची वेळ आलेली आहे ,व काम करत असताना कोणत्याही सुविधा आम्हाला मिळत नाही त्यामुळे सुरक्षा रक्षकावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे ,
खालील मागण्या या प्रमाणे
1)सुरक्षा रक्षक चा P.F कट करण्यात यावा.2)पगार हा बँक खात्यात जमा करावा .3)वेतन हे 1 ते 7 तारिख च्या दरम्यान करावे
4)महिन्यातून 26 दिवस काम व
4 रजा नियमानुसार देण्यात याव्या.
वरील मागण्या येत्या 5 दिवसात निकाली लावल्या गेल्या नाही तर आम्ही व भिम आर्मी संघटना च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल ,आंदोलन करताना कोणत्याही अनुसूचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी ही शासन आणि प्रशाशन याची राहील.निवेदन देतेवेळी आशिष सोनटक्के जिल्हा अध्यक्ष भिम आर्मी वर्धा ,कपीलवृक्ष गोडघाटे ,बंटी रंगारी चंद्रा बागडे ,संगीता पाटील ,योगेश शेरे ,लीला ठाकर ,रीना ओकार ,पवन ओकार,सुहास ,फुलझेले ,शमुलाल पेंदाम,पंचराम पेदाम, नरेंद्र पाटील ,राजेश सोळंकी ,प्रकाश ठाकरे ,संतोष वाघ ,अभिजित बावणे ,दीक्षित सोनटक्के आकाश पाझारे व इतर कामगार उपस्थित होते.