Home जळगाव मुस्लिम मंच चे उपोषण ४९ व्या दिवशी सुरूच

मुस्लिम मंच चे उपोषण ४९ व्या दिवशी सुरूच

207

जिल्ह्यात मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री असतानाही कोणीही दखल घेतली नाही मुस्लिम मंच ची खंतरावेर (शरीफ शेख)जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शनिवार हा एकोणपन्नासावा दिवस या दिवशी शहा बिरादरी व अंजुमन खिदमत खल्क च्या महिला व पुरुषांनी सक्रिय सहभाग नोंदवून भारतीय नागरिकत्व सुधारित कायद्याला विरोध नोंदविला.आज जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांसह इतरांची उपस्थिती असल्याने कोणीतरी उपोषणाची दखल घेईल या इराद्याने जळगाव मुस्लिम मंच चे उपोषणार्थि संध्याकाळ पर्यंत आपल्या उपोषण ठिकाणी थांबले परंतु मुख्यमंत्री अथवा इतर मंत्र्यांनी दखल न घेता उपोषण आर्थी ना वाऱ्यावर सोडून दिले. परंतु पोलीस अधिकारी मात्र लक्ष ठेवून होते उपोषण आर्थी हे मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी विमानतळ, जैन हिल्स अथवा मार्गावर थांबून निवेदन देता कामा नये म्हणून ते ततपर होते
मुस्लिम मंच तर्फे समन्वयक फारुक शेख यांनी शासनाच्या लोकप्रतिनिधी बाबत खंत व्यक्त केली.*उपोषणाला सुरुवात*
४९ व्या दिवसाचे उपोषणाची सुरुवात राहत लइक शाह या मुलीने पवित्र कुराण पठण करून केली तर सांगता ही शरीफ शाह बापू यांच्या दुआँ ने करण्यात आली.
*उपोषणार्थि ना मार्गदर्शन* फारुक शेख यांनी ४९ दिवसातील घटना विषद केल्या तसेच या ४९ दिवसात मन्यार बिरादरी व शाह बिरादरी यांनी तीन वेळा सक्रिय सहभाग नोंदवून विरोध केला त्याबद्दल दोघी बिरादरीचे अभिनंदन केले आश्रफ उन्निसा डॉक्टर अमानुल्ला, विनोद आडके, शरीफ शाह, उमेर बानो जोया शाह, हाफिस अब्दुल रहीम, अल्लाउद्दीन शेख, रिजवाना आरा, शमीम मलिक यांनी मार्गदर्शन केले
कुमारी उनमे रमण यांनी शेअर सादर केला असता त्याला मोठ्या प्रमाणात टाळ्या मिळाल्या *साहिल की खामोशी को चिरता हुवा अहेतेजात का एक सैलाब आयेगा,
इन्कलाब पहन के बिंदी,चूड़ी बुर्खा ,हिजाब*यांची होती विशेष उपस्थिती* मजिद झकेरिया, तबरेज शेख, जाकीर शाह, इमरान खान, लईक शाह, कयूम पिंजारी, मुस्ताक करीमि, नईम बिस्मिल्ला, शकीला करीम, जमीला शेख, नाजीया शेख, नसरीन काज़ी*उपजिल्हाधिकारी भारदे यांना निवेदन*
डॉक्टर अमानुल्ला शहा यांच्या नेतृत्वात नसीम शाह, श्रीमती शमीम मलिक, तबस्सुम शाह, शरीफ शाह,फारूक अहिलेकार, शकील शाह यांनी उपजिल्हाधिकारी भारदे यांना निवेदन दिले.