मराठवाडा

धनगरवस्ती वाचविण्यासाठी समाजाने पुढे यावे – सखाराम बोबडे

पोलीसवाला न्यूज नेटवर्क

सातारा जिल्हाधिकार्याना लिहिले पत्र…

परभणी / गंगाखेड , दि. ०७. राज्यकर्ते, शासन, प्रशासन यांचा अन्याय सहन करत आलेल्या धनगरवस्तीवर निसर्गही कोपला आहे. पंधरा ते वीस घरांची वस्ती असलेल्या सवारवाडी (ता. पाटण पाटण जि सातारा) येथील धनगर वस्तीची जमीन खचत असून बाजूची दरड केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वस्ती वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाने पुढे याव असा आवाहन धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केल आहे.

तालुक्यात गाव असलेल्या पाटण पासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर सवारवाडी तारळे भाग शिवारात धनगरांची वस्ती आहे. माळाच्या पोटाशी असलेली 15 ते 20 घरांची वस्ती असून यातील बहुतांशी मानसे व कामासाठी पुणे, मुंबईला गेले आहेत. वस्तीवर व्रध्द आणि बालकेच असून मागील आठ दिवसापासून गावात वस्तीवरील जमीनीस भेगा पडत आहेत. जमीन खचत आहे. जमिनीतून आवाज येत आहेत.वस्तीचा वीज पुरवठा बंद आहे. अशा विचित्र अडचणीत सापडलेल्या या धनगर वस्तीस नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाने पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर पाटणचे तहसीलदार व साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांना पत्राच्या माध्यमातून संपर्क साधून या वस्तीचे ताबडतोब पुनर्वसन करावे असे आवाहन धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलं आहे.

330 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close