ताज्या घडामोडी

पोलीस प्रशासन करणार सर्व बोअरवेलचे जलपुनर्भरण..!

⭕पहिल्या टप्प्याचा पोलीस मुख्यालयात शुभारंभ…!!

संजय कोल्हे

जालना , दि. ०७ :- औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्र सिंघल आणि पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण विभागाच्या वतीने पोलीस मुख्यालय आणि शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या बोअरवेलचे जलपुनर्भरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज बुधवारी (ता. 7) पोलीस मुख्यालयातील पोलीस क्लबमधील बोअरवेलच्या पुनर्भरणाचे काम सुरू करून शुभारंभ करण्यात आला आहे.
पावसाचे पडलेले पाणी जिरवून जलस्त्रोत बळकट करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या बोअरचे जलपुनर्भरण करण्याचा निर्णय पोलीस अधिक्षक एस चैतन्य यांनी घेतला आहे. जलपुनर्भरणाच्या पहिल्या टप्प्यात पोलीस मुख्यालय आणि जालना शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या 10 बोअरवेलचे जलपुनर्भरण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या बोअरवेलचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. पुनर्भरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पोलीस क्लबमधील बोअरचे पुनर्भरणाचे काम सुरू करून करण्यात आला आहे. यावेळी पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, जलपुनर्भरणाचा तंत्रशुध्द अभ्यास असणारे समाजसेवक रघूनंदन लाहोटी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कल्याण विभाग परिश्रम घेत आहे.

45 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close