Home पश्चिम महाराष्ट्र नाशिक विभागत बदली धोरण अभ्यास गट समितीची बैठक संपन्न…!

नाशिक विभागत बदली धोरण अभ्यास गट समितीची बैठक संपन्न…!

226

लियाकत शाह

मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद अभ्यास गट समिती. यांचेकडे संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. अ़जिज शेख संघटनेच्या वतीने विविध सूचना केल्या व त्यानंतर आपले निवेदन सादर केले. आपसी बदली साठी सेवेची अट नसावी. तसेच दोघांची जागा रिजर्व ठेवणे. पती पत्नी एकत्रीकरणाला पुर्ण पणे संरक्षण दया. बदली प्रक्रियेत महिला कर्मचारीस प्रधान्य दिल्यानंतर रिक्त जागांवर पुरुष कर्मचार्‍यांना इच्छुक असेल तर सेवेची अट न लावता पदस्थापना देण्यातयावी. RTE अनुसार उच्च प्राथमिक शाळेत पटाची अट शिथिल करुन प्रत्येकी ३ पदवीधर शिक्षकांची नेमणूक करा व ज्या शिक्षकांची सेवा १० वर्ष झाली असेल व आज पर्यंत आंनलाईन बदली झाली नाही त्यांना बदलीची संधी दया. १०वर्ष सेवा केलेले कर्मचार्‍यांना विनंती बदलीची परवानगी मिळावी. पती पत्नी एकञिकरण संर्वगातील बदलीधारकांना विनाअट विनाविलंब प्राधान्य क्रमाने बदली प्रक्रीयेत सामावुन घ्यावे. इतर संर्वगाच्या कर्मचार्‍याच्या बदल्या करतांना त्यांना पेसा TSP क्षेञात बदल्या करु नये. पेसा क्षेञात १००% स्थानिक बोलीभाषेच्या शिक्षकांच्या बदल्या प्राधान्याने कराव्यात ह्दय शस्त्रक्रियेबरोबर एन्जिओप्लिस्टीक सर्जरी ची सवलत उपलब्ध करुन द्यावी. पती पत्नी आंतरजिल्हा बदलीत ३० किमी च्या आत नियुक्ति द्यावी आंतरजिल्हा बदलीत१०% रिक्त पदाची अट उर्दु माध्यमासाठी रद्द करण्यात यावी. सिनिरियटी प्रमाणे वरिष्ठ असलेल्या पंरतु बदली प्रक्रियेतुन वगळले गेलेल्या कर्मचार्‍यानां बदली. न.पा म.न.पा व नगर परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन करण्यात याव्या. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या ह्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात याव्या इत्यादी मुद्दयवर सादरीकरण केले. संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष इलहाजुद्दिन फारुकी व राज्य सरचिटणीस अब्दुल सलाम इनामदार यांनी नाशिक जिल्हाध्यक्ष अजीज एजाज यांचे अभिनंदन केले.