World

सुषमा स्वराज यांच्या अंत्यविधीला उपराष्ट्रपतींची उपस्थिती

पोलीसवाला न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली , दि. 7 :- माजी परराष्ट्रमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी नायडू यांनी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. स्वराज यांच्या अकाली निधनाने आपल्याला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले. त्यांच्या निधनाने देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे असे ते म्हणाले.

उत्तम प्रशासक, असामान्य संसदपटू आणि अतिशय प्रभावी वक्त्या म्हणून त्या ओळखल्या जात. नायडू यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सुषमा स्वराज आणि त्यांच्या कुटुंबांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. दरवर्षी त्या आपल्याला राखी बांधायच्या असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

103 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close