Home मराठवाडा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पाथ्रीकर कॅम्प्स बदनापूर येथे पोवाडे, नाटयछटा व...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पाथ्रीकर कॅम्प्स बदनापूर येथे पोवाडे, नाटयछटा व संगीतमय कार्यक्रमांने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

229

सय्यद नजाकत

बदनापूर, दि. २२ :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त येथील पाथ्रीकर कॅम्प्स येथे बदनापूर तालुक्यात पहिल्यांदाच भव्य्‍ उत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी पोवाडे, नाटयछटा व संगीतमय कार्यक्रमांनी प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले होते. तालुक्यात पहिल्यांदाच छत्रपती जीवनचरित्रावर प्रसीध्द असा कार्यक्रम साजरा झाल्यामुळे बदनापुरकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेच्या पाथ्रीकर कॅम्पस येथील भव्य अशा अडोटोरियम सभागृहात शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे कार्यकारी संचालक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुक्यातून शेकडो शिवभक्त या कार्यक्रमात सहभागी झाले होते. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तास भगवा फेटा व शिवाजी महाराज असलेला बॅच तसेच कपाळी चंद्रकोर लावून स्वागत करण्यात येत होते. या वेळी औरंगाबादचे प्रसीध्द शाहीर विजय काटे यांच्या शाहीरी शिवदर्शन या कार्यक्रमाने महोत्सवास सुरुवात झाली. त्यांनी संभाजीराजे व शिवाजी राजे यांच्या जीवनचरित्रावरील पोवाडयांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला. त्यानंतर नेहा कुलकर्णी या लहानगीने शिवगितावर नृत्य सादर केले. टिंवकल स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणता राजा ही एकांकीका सादर केली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर, प्राचार्या डॉ. सौ. एम. डी. पाथ्रीकर, डॉ. शेख एस.एस., डॉ. विजय पाथ्रीकर, डॉ. खान एन. जी. पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्प्हार अर्पण करून शिवाजीमहाराज यांची आरती करण्यात आली. मुख्य कार्यक्रमात युगपुरुष : शिवगौरव गाथा या कुणाल वराळे प्रसतुत विशेष संगीत रजनीत शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्र सांगणारे विविध गिते सादर करण्यात आली. या गितांच्या ठेक्यावर सर्व प्रेक्षकांनी ठेका धरला होता. यावेळी इन्स्टीटयूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नरवीर तानाजी मालुसरे व उदयभान युध्दाची नाटीका सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले तर शिवजन्म, अफजलखान वध व शिव राज्याभीषक असे एकाकिंका सादर करून बदनापूर शहरात जाणता राजासारखे नेपथ्य याद्वारे दाखवून दिले. शिवराज्याभीषेक प्रसंगाने सर्वत्र जयघोष करण्यात आला. सर्वत्र भगवे फेटे व सभागृहात दर्शनी भागात दर्शन वयवहारे या फार्मसीच्या पहिल्या वर्षाच्या मुलाने जवळपास 15 फूट रूंद व 20 फूट लांब अशी भव्य शिवमूर्ती रांगोळीद्वारे रेखाटलेली होती, ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील कबडडी संघातून राष्ट्रीय पातळीपर्यंत निवड झालेल्या 20 विद्यार्थ्यांचया व त्यांचे मार्गदर्शक असलेले डॉ. माणिक राठोड यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. बदनापूर तालुक्यात पहिल्यांदाच भव्य अशा प्रमाणात हा कार्यक्रम साजर करण्यात आलेले हेाते.