ताज्या घडामोडी

अखेर धरणात बुडालेल्या शुभम चा मृतदेह मिळाला…

कुशल भगत

आकोट , दि. १३ :- तालुक्यातील पण ज परिसरात असलेल्या शहापूर ब्र हूत प्रकल्पामध्ये काल दुपारी आंघोळ करत असताना वडाली देशमुख येथील शुभम फुकट हा युवक धरणात बुडाला होता त्याला शोधण्यासाठी संत गाडगे बाबा पथकाला पाचारण करण्यात आले होते त्यांनी आज सकाळपासून धरणात शोध मोहीम राबविण्यात आली त्यांच्या सोबत ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार ज्ञानोबा फड हे देखील बोट मध्ये जाऊन घटनास्थळी दाखल झाले होते आज पाऊने सहा चे दरम्यान शुभम चा मृतदेह आढळला आहे त्याला पोस्ट मातंम साठी ग्रामीण रुग्णालय अकोट येथे नेण्यात आले आहे यावेळी तहसीलदार गीते साहेब ,नायब तहसीलदार गुरव साहेब यांनी सकाळी भेट देऊन पाहणी केली होती ,यावेळी परिसरातील लोकांनी भली मोठी गर्दी केली होती गर्दीवर नियंत्रण करणे साठी ग्रामीणचे पोलिस मोठ्या ताफ्यासह हजर होते.शहापूर प्रकल्प मध्ये ऐवधी मोठी घटना घडली आहे तरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकले ही नाहीत व कोणत्याच प्रकारची सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले नसल्यामुळे परिसरातील लोकांनी रोष व्यक्त केला आहे

104 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close