मराठवाडा

एसटीचे प्रमाणपत्र हातात घेऊनच आरक्षणाची लढाई थांबेल- सखाराम बोबडे

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

परभणी , दि. १३ :- आता बस झाले. सवलती, आश्वासन याला बळी न पडता एसटी आरक्षण प्रमाणपत्र हातात पडल्या शिवाय धनगर समाजाचा युवकांची आरक्षणाची लढाई थांबणार नसल्याचा विश्‍वास सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सोमवारी व्यक्त केला.ते परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित ठिया आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलका समोर बोलत होते. सकाळी ठिय्या आंदोलन सुरू झाल्यानंतर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी परत ठिय्या मांडला. यावेळी एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र धनगर समाजाच्या युवकांच्या हातात पडल्याशिवाय हा लढा थांबणार नसल्याचा पुनरुच्चार आंदोलनकर्त्यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते कठाळूमामा शेळके,छ गंगासागर वाळवटे, धनगर साम्राज्य सेना सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, प्रभाकरराव जगाडे, धनगर साम्राज्य सेनेच्या महिला आघाडीच्या परभणी जिल्हा अध्यक्षा संगीताताई जगाडे, सीताताई बालटकर, राजेश बालटकर, भाजपाचे उपाध्यक्ष सुरेश भुमरे, पांडुरंग मामा बनसोडे, मुंजाभाऊ लांडे ,आदीसह धनगर समाजाचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, महात्मा फुले समता परिषद गोविद यादव,बंजारा क्रांती दलाचे दशरथ राठोड यांनी उपस्थित राहून या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता जगाडे,लक्ष्मण बोबडे, राम चांदणे, सचिन गारुडी, अर्जुन खनपटे, प्रसाद लेगुळे,.राम महाराज बनसोडे,डाॅ.अ ल शेळके,,राम बनसोडे, आदींनी प्रयन केले.

381 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close