प.महाराष्ट्र

अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात..!!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

पुणे , दि. १३ :- यावर्षी कोल्हापूर येथे अतिवृष्टी मुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आला आणि सर्व नागरिक बेघर झाले. जनावरे सुद्धा महापुरामध्ये वाहून जाऊन ते मृत पावले.अश्यातच पूरग्रस्त नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आणि तत्यांना मदतीची गरज होती. तसेच महाराष्ट्र मधून प्रत्येक जिल्ह्यातून पूरग्रस्तांना मदत मिळत आहे.

त्याचप्रमाणे अखिल भारतीय सेनेच्या पुणे शहर महिला अध्यक्ष सौ.पुजाताई साठे आणि त्यांचे सहकारी यांनी 2 दिवस कोल्हापूर मधील नायगाव, शिरोली, रामनगर, शियेगाव,माळवाडी, गोसावी वस्ती आणि हौशिंग सोसायटी मध्ये राहून तेथील परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांना धीर देत पूरग्रस्त नागरिकांना धान्य, कपडे, आणि बिस्कीट तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू मदत म्हणून पूरग्रस्तांना मदत केली. तेथील नागरिकांनी पूजा साठे व त्यांच्या सहकार्याचे आभार व्यक्त केले.

154 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close