ताज्या घडामोडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक तथा प्रतिसाद फाउंडेशनचे सदस्य यांनी गरीब,अनाथ बालकांना व वृध्द महिलांना केले वस्त्रदान….!!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १३ :- प्रतिसाद फाउंडेशनचे धडाडीचे सदस्य विनोद दोंदल हे आपल्या अभिनव कल्पनेतुन समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात सध्या सुपरिचित आहे.त्यांनी आपले अंगावरील वस्त्रदान करुन आपल्या समाजाला संदेश दिला.मंगळवार रोजी आठवडी बाजार येथील जागृत असलेल्या देवीच्या मंदिर परिसरात विनोद दोंदल,सुकांत वंजारी,किशोर कुळसंगे यांनी आपल्या कडील उपयोगात नसलेले लहान मुलांचे कपडे व साड्या दान करण्याच्या उद्देशाने गेले व त्या ठिकाणी मंदिराच्या द्वाराजवळच काही भिक्षेकरी व अनाथ मुले नजरेस पडले.त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या लहान मुलाच्या कपड्यांचे व साड्याचे वाटप सुरु केले असता त्याच परिसरात उघड्यावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील लहान मुले त्यांचा कडे धावत आले व आपल्याला कोणीतरी नवे कपडे आणले या आशेने आठ दहा मुले गोळा झाली.त्यांनी सोबत आणलेल्या कपड्यांचे वाटप सुरु केले असता त्या बालकांचा नविन कपडे पाहुन आनंद गगनात मावेनासा झाला होता गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी कपडे पाहिलेच नाही ,

असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता व कपडे मिळविण्यासाठी झटापट करत होते हे पाहुन खरचं पाहणाऱ्याचे डोळे पानावले.उपस्थित असलेल्या प्रत्येक बालकांना व महिलांना कपड्यांचे व साड्यांचे वाटप करण्यात आले.तेवढ्याच एक अंत्यत गरजू व गरीब व्यक्ती त्या ठिकाणीवर आला व केविलवाण्या सारखा मला ही काही कपडे द्या अशी विनवणी करु लागला मात्र त्यांच्या पुरुषांचे कपडे नसल्याने हताश झालेल्याने त्या व्यक्तीला विनोद दोंदल यांनी अक्षरशः आपल्या अंगावरील शर्ट काढुन सर्वांना आश्चर्य चकित केले व त्या व्यक्तीच्या डोळ्यातुन अश्रु धारा अनावर झाल्या या प्रकारे अंगावरील वस्त्रे दान करणारा व्यक्ती कदाचित असतो असा अभिनव उपक्रम यांनी राबविला,मनसेचे महाराष्ट्र सैनिक व यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले प्रतिसाद फाउंडेशनचे विनोद दोंदल,सुकांत वंजारी,किशोर कुळसंगे यांनी ही आपल्या सोबत आनलेले कपडे व साड्या दान करण्याच्या उपक्रम राबविला असुन विनोद दोंदल,त्यांच्या पत्नी सौ.किर्ती मुलगी काश्यपी,मुलगा वाहुल उपस्थित होते….

69 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close