गुन्हेगारी

अग्नीशस्त्र बाळगणार्या आरोपीला तसेच खुनाच्या गुन्ह्यातील महिलेला केली अटक..

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही….

रवि माळवी

यवतमाळ , दि. १४ :- पुसद येथील वसंतनगर हद्दीतील टिपु सुलतान चौकात आरोपी हा रस्त्याने फिरत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक लोखंडी देशी बनावटीची पिस्टल व जिओ कंपनीचा मोबाईल सापडला ते पोलीसांनी जप्त केले. सदर आरोपी हा त्याच्या दोन मित्रासोबत घरफोडी करीत होता. पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने एका महिलेच्या घरी चोरीतील सोन्याचे दागीने व रोख रक्कम ठेवली होती. महिलेला अटक केली असता तीच्यावर आधीच पोलीस स्टेशनला काही प्रकरणामध्ये गुन्हे दाखल होते आपर्यत ती महिला फारार होती.

गणेश दत्तराव पवार (२६) रा.अंबाळा ता.हदगांव जि.नांदेड व चंदा उर्फ नेहा आशिष ढेपे रा.नाईक बंगल्याजवळ, गांधी नगर पुसद असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनांक १२ ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथक स्थानिक गुन्हे शाखा यवतामळ हे पुसद शहरात ईद बंदोबस्ता निमितने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन गुलाबी रंगाचा शर्ट व जिन्स पॅन्ट घातलेला ईसम पुसद येथील वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील टिपू सुलतान चौकात फिरत होता. तात्काळ पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथक तिथे पोहचले व आरोपीला गणेश पवारला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक लोखंडी देशी बनावटीची पिस्टल किंमत ३० हजार रुपयाचे व एक जीओ कंपनीचा मोबाईल किंमत १ हजार रुपये असा एकुण ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीविरुध्द वसंत नगर पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करुन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. नमुद आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने मागील दोन महिण्यापुर्वी पुसद शहरातील गोविंदनगर परिसरात त्याचे ईतर दोन साथीदारासह घरफोडी केल्याचे सांगून घरफोडीतून चोरलेला मुद्देमाल व रोख रक्कम त्याचे परिचयाची महिला चंदा उर्फ नेहा ढेपे हिचेकडे ठेवले असल्याचे सांगीतल्याने पोलीस पथक तिथे जावून तिची विचारपुस केली असता तिने नमुद मुद्देमाल तिचे जवळ असल्याचे सांगून एक सोन्याची अंगठी काढून दिली व नगदी रक्कमेमधुन सोन्याचे दोगीने खरेदी केल्याचे सांगून एक मंगळसुत्र, एक कुरडु जोड, एक चांदीचे जोडवा, एक तोरडी जोड असे दागीने एकुण किंमत ३८ हजार रुपयाचे जप्त करुन ताब्यात घेतले. सदर महीले विरुध्द वसंतनगर पोलीस स्टेशनला येथे अप.क्र.०५/१७ भादंवि कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा आधीपासूनच नोंद केला असून ती घटणेपासून फरार होती. तिने स्वत:जवळ बाळगलेल्या घरफोडीतील मुद्देमालाबाबत पुसद शहर पोलीस स्टेशनला येथे अप.क्र.२५९/१९ भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपी महिलेला व जप्त मुद्देमाल पुसद शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, गोपाल वास्टर, पंकज पातुरकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच आरसीपी पथक महीला कर्मचारी वैशाली बोरडे, सपना उईके, छाया उमरे यांनी पार पाडली.

148 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close