Home महत्वाची बातमी अकोला मुली बेपत्ता प्रकरण , ” पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली”

अकोला मुली बेपत्ता प्रकरण , ” पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली”

183

दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन, गृहमंत्र्यांचे आदेश…!!

कुशल भगत

सरकार एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोठमोठ्या घोषणा करतं. मात्र, सरकारी व्यवस्था, पोलीस यंत्रणा अनेकदा अशा संवेदनशील विषयातही ‘हम नहीं सुधरेंगे’चा राग आळवतांना दिसतेय. सरकार आपल्या पोलीस व्यवस्थेला खरंच वठणीवर आणणार का? हाच प्रश्न होता. मात्र आजच्या या कारवाईने पोलीस प्रशासनाचे देखील डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे.

मुंबई : अकोल्यातील बेपत्ता मुलीच्या संदर्भात तक्रारीची दखल न घेतलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे तर अन्य दोन पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात आज अधिवेशनात आदेश दिले. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी महिला अत्याचारांच्या घटना होतील. अशा ठिकाणी त्यांच्या तक्रारी दाखल झाल्या नाहीत तर पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले.

महिलांवर अत्याचाराच्या घटना किंवा झाल्यानंतर त्यांना वागणूक चांगली मिळत नाही. याबाबत अकोल्यामध्ये किरण ठाकूर यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणात व्यवस्थित तपास न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी भानुप्रताप मडावी, श्रीमती कराळे यांना निलंबित करण्यात आले आहे तर तर अकोला एसपी अमोघ गावकर यांची बदली करण्यात आली आहे.