उ. महाराष्ट्र

आता अल्पसंख्यांक प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती लाभार्थ्यास मिळणारच

निखिल मोर

पाचोरा , दि. २० :- श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एफ.के. सिद्दीकी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे अध्यक्षतेखाली सर्व जि. प. शाळांचे मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न झाली. विकास पाटील यांनी अल्पसंख्यांक प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती व कार्यशाळेचा मुख्य उद्देश उपस्थितांना पटवुन दिला. सूत्रसंचालन वडगाव बु” येथील मुख्याध्यापक किशोर पाटील यांनी केले.
पाचोरा तालुका विधी समितीचे अध्यक्ष तथा पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी यांनी मार्गदर्शनात सांगितले की, अल्पसंख्यांक प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती काही पात्र विद्यार्थ्यांना सन 2009 ते 2014 – 15 या कालावधीत सदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे शब्बीर गुलाम गौस देशमुख व इतर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका क्रमांक. 50 / 2016 दाखल केली होती. सदर याचिकेचा निकाल दिनांक 17 जुलै 2019 रोजी लागला असून सदर निकालात दिलेल्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. यासाठी अचूक माहिती भरण्यासाठी सहा महिन्यांच्या अवधीचे हायकोर्टाचे निर्देश आहे. सलाउद्दीन यांनी पी.पी.टी. द्वारा अल्पसंख्यांक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती रजिस्ट्रेशन व विद्यार्थ्यांची माहिती कशी भरायची याबाबत ऑनलाइन पी.पी.टी. प्रेझेंन्टेशन दाखविले. त्याचसोबत पाचोरा तालुक्यातील प्राथमिक शाळांचा ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा आढावा घेतला असता 79 पात्र शाळांपैकी 43 शाळांचे रजिस्ट्रेशन केल्याचे आढळले. उर्वरित सर्व शाळा मुख्याध्यापकांकडुन शिष्यवृत्ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन भरवायचा फॉर्म भरून घेण्यात आला. यामुळे 100 टक्के काम पूर्ण होणार आहे. शिक्षण विस्ताराधिकारी जितेंद्र महाजन व रवींद्र सपकाळे यांची प्रशासकीय बदली चाळीसगाव येथे झाल्याने त्यांना गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांच्या वतीने निरोप देण्यात आला. अध्यक्षीय भाषणात विकास पाटील यांनी शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा, युवा जागर, महाराष्ट्रावर बोलू काही, गणित संबोध अनुदान, बालचित्रकला स्पर्धा, गणित पेटी, भाषा पेटी, इंग्रजी पेटी, वृक्षारोपण, शालेय पोषण आहार, स्वच्छतेबाबत घ्यावयाची काळजी, तपासणी पथक यंत्रणा, मुलांचे हक्क व सुरक्षितता उपक्रम, फळांचा खोल्या, पूरस्थिती, विद्युत यंत्रणा, गणवेश यंत्रणा, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती इत्यादी विषयांवर सखोल चर्चा केली उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक किशोर पाटील यांनी मानले. यानंतर राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. गटशिक्षणाधिकारी सनेर, शिक्षण विस्ताराधिकारी सरोज गायकवाड, पाचोरा तालुका विधी समिती सहाय्यक दीपक तायडे, जितेंद्र महाजन, सर्व केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, मोबाईल टीचर, बी.आर.सी. स्टाफ सह मुख्याध्यापक उपस्थित होते.

30 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close