प.महाराष्ट्र

प्राईड सर्व्हिसेसचे मा.मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते उदघाटन

सतीश डोंगरे

मायणी / सातारा , दि. २० :- हाँटेल प्रिती एक्झिक्युटीव्ह शेजारी मिथून कदम यांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सर्व्हिसचे प्राईड सर्व्हिसचे उदघाटन कराड उत्तरचे भाजपा नेते मा.मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते व मिथून कदम, कृष्णत शेडगे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना मनोजदादा म्हणाले,

आज काळानुसार पारंपारिक व्यवसाय बदलून डिजीटल व्यवसायाकडे ग्राहकांचा कल वाढला असून कामाच्या व्यस्ततेमुळे ग्राहक आँनलाईन खरेदी करण्यास पसंती देत आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या वस्तूंची सर्व्हिस ही तेवढीच महत्त्वाची असून हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाणारा असून भविष्याची गरज ओळखून मिथून कदम यांनी इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व्हिस सेंटर सुरू केले आहे. त्याचा आदर्श तरूणांनी घेवून नवनवीन व्यवसायांच्या संधी शोधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच मिथून कदम यांनी ग्राहकांना उत्तमोत्तम सर्व्हिस देवून ग्राहकांचे व कंपनीचे समाधान करावे.

सदर कार्यक्रमास प्रकाश साळुंखे, संतोष देशमुख, गौरव पवार, वैभव गायकवाड, सैफ बागवान, प्रीतम साबळे, सौ.कीर्ती मगर, सौ.पल्लवी कदम,सौ.मीना शिंगाडे सौ.सारिका कदम, राकेश जाधव, सुधीर शेळके, समाधान कदम आदी उपस्थित होते. सुञसंचालन सौ.प्रगती साळुंखे तर अशोक कदम यांनी आभार मानले.

84 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close