विदर्भ

दोन गटात झालेल्या सशस्त्र झालेल्या हाणामारीत दोन ठार

एक गंभीर….

शाहिद इकबाल

अकोला , दि. २१ :- पूर्वमैनस्यातून दोन गटात हाणामारी होउन दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या लानखवाडा येथे आज दुपारी घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.लाखनवाडा येथील सोळंके आणि डाबेराव या दोन गटात अकोला शहरानजीक असलेल्या चांदूर सातमोरी भागात वाद झाला. तेथे काही जणांनी एकास मारहाण केली. तेथून मारहाण झालेला युवक लाखनवाडा येथे आला. तेथे दहा ते बाराजणांनी त्या युवकासह दोघांवर कुरहाडी आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केला.https://youtu.be/KI5BgfVHn2Eयामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अकोला जुने शहर पोलीस आणि बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण दुधाजी डाबेराव (४०) यांचा मृत्यू झाला. तसेच गंभीर जखमींमधील कृष्णा सोळंके 38 यांचा सायंकाळी मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या एकावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी सचिन दीपक वाकोडे, प्रवीण दीपक वाकोडे, सागर संतोष शिरसाट यांना ताब्यात घेतले.बातमी लिहोस्तर या प्रकरणी बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

79 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close