विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक लक्ष्मी सातपुतेने मुख्यमंत्र्यांना बांधले रक्षासुत्र

कल्पक वाईकर

यवतमाळ , दि. २१ :- भारतीय जनता पार्टीच्या नियोजित कार्यक्रमानुसार आज 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथे राज्यभरातून गेलेल्या महिलांसह, यवतमाळ जिल्ह्यातून लक्ष्मी सातपुते या अल्पभूधारक शेतकरी महिलेने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष रक्षासूत्र बांधले.

हा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद हॉल मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातून 52 महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून संयोजिका सहसंयोजक व त्या मंडळातून लाभार्थी महिलांचा समावेश होता सर्व जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्र्यांना रक्षासूत्र बांधले यवतमाळ जिल्ह्यातील लक्ष्मी सातपुते ही अल्पभूधारक शेतकरी महिला रक्षासूत्र बांधण्यासाठी पात्र ठरली .या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील ना. पंकजा मुंडे तर यवतमाळ जिल्ह्यातून महिला शाखेच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा कोठेकर, जिल्हा अध्यक्ष ज्योती मानमोडे, जिल्हा महामंत्री सौ. मायाताई शेरे विधानसभा संयोजिका सौ कीर्ति राऊत, नगरसेविका संगीता कासार, सहसंयोजक सुनिता मडावी व लक्ष्मी सातपुते उपस्थित होत्या.

74 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close