अपघात

नागपुर हैदराबाद रस्त्यावर ट्रक कॅनल मध्ये पडुन क्लिनर ठार तर चालक गंभीर जखमी.!

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवारवर्धा , दि. २१ :- जिल्ह्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ ने नागपूर वरुन जाम कडे सेंटिगचे पाईप घेऊन येत असलेल्या ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने‌‌ ट्रक आजदा शिवारात अनियंत्रित होऊन कॅनलच्या पुलावर जाऊन धडक देत कॅनल मध्ये पडला.या भिषण अपघातात क्लिनरच्या अंगावर ट्रक मधिल पाईप पडुन तो जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला. मुत्यक क्लिनरचे नाव एहसान खान अयुब खान वय २८ वर्ष राहणार पलवल मेवाद (हरीयाण) तर जखमी चालकाचे नाव नशिब खान अब्बास खान वय २२ वर्ष राहणार मटेपुल पलवल (हरीयाण) असे आहे.
घटनेची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकीला मिळताच पोलिसांनी घटनास्थ गाठून जखमी चालकास उपचारासाठी हलवले व मुत्यक क्लिनरला पाईप च्या ढिगाऱ्या बाहेर काढून पि एम साठी समुद्रपुर ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. पुढिल तपास समुद्रपुर पोलीस करीत आहे.

55 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close