अकोला

राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत ११,००० रु.फंड जमा केला.

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले”

कुशल भगत

अकोट , दि. २१ :- सत्यपाल महाराज यांची मदतीची भावना “मानवतेच्या अत्युच्च पातळीची आहे” हे मात्र नक्की…, सांगली कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक गावपातळीवरील सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत,व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत,पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही विविध मित्रपरिवार,सामाजिक संघटना एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे.यासाठी सिनेकलाकार सरकारी नोकर,अधिकारी ते सर्वसामान्य जनतेने तन मन धनाने मदत केली आहे.

पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी मदकार्य जोरात सुरू आहे.सेलिब्रिटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वचजण आपापल्या परीने मदत करत आहेत.अनेक संस्था संघटनाही पुढाकार घेत आहेत.त्यामध्ये आता राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी सुद्धा पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११,००० रु.ची मदत पाठवली आहे.सत्यपाल महाराज जे आपल्या सप्तखंजेरी च्या माध्यमातून गेली ५३ वर्षांपासून अखंड भारतभर संत महापुरुष यांचे विचार आपल्या प्रबोधनातून मांडत आहेत.त्यामध्ये देशसेवा देशभक्ती या विषयावर सुद्धा ते प्रबोधन करत असतात त्याचेच जिवंत उदाहरण त्यांनी आज या मदतीतून दिले आहे.सत्यपाल महाराजांनी “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” याप्रमाणे प्रेरणादायी कार्य केले आहे.त्यांची मदतीची भावना मानवतेच्या अत्युच्च पातळीची आहे हे मात्र नक्की.

49 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close