अमरावती

“सेव मेरीट सेव नेशन”

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

धामनगाव रेल्वे , दि. २२ :- हे आंदोलन कोणत्याही जाती,धर्माच्या विरोधात नाहीच देशाच्या सर्वांगीण विकासाकरीता मेरिटला प्राधान्य देण्यात यावे प्रतिभाशाली व गुणवंत विद्यार्थ्यांना आरक्षणात बांधन्यात येऊ नये या विद्यार्थयावर अन्याय होऊ नये गुनवत्ताप्राप्त आणि प्रतिभासम्पन विद्यार्थी राष्ट्र उत्थानाकरिता महत्वाचा दुआ आहे त्यामुळे “सेव मेरीट सेव नेशन”आन्दोलनान्तर्गत धामनगाव येथे आयोजीत २३ ऑगस्ट च्या शांती प्रिय महारॅलीत हजारोच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत आन्दोलनाचे समन्वयक डॉ.अशोक भैया यांनी येथे केले.

माहेश्वरी भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत डॉ. भैय्या म्हणाले की,सरकारने ने संविधानाची पायमल्ली करीत ५०% आरक्षण मर्यादेला पार केले त्यामुळे समाजातील हुशार आणि प्रतिभासम्पन्न मोठ्या समुदायावर कुठाराघात करण्यात येत आहे सरकारचे है कार्य असंवैधानिक आहे आणि अन्याय पूर्ण आहे सरकारच्या या कृतिमुळे राष्ट्राच्या उत्थानातही खिळ बसत असल्याचे उदाहरनासह त्यांनी सांगितले.

त्यांनी आवाहन केले की आम्ही संघटित होऊन या गोष्टीचा विरोध केला नाही तर गुणवत्ता अभावी राष्ट्राचेही पतन होईल त्यामुळे राष्ट्रनिर्माणाकरिता एक होऊन संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे याकरिता माताजी मंदिर परिसरातुन सकाळी ९ वाजता पासून महा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे , उठा व्हा,जागे व्हा,संघर्ष करा आणि “सेव मेरीट सेव नेशन” आंदोलन यशस्वी करा याकरिता २३ ऑगस्ट च्या महा रॅलीत सहभागी व्हा असे आवाहन धामनगावच्या समितिने केले आहे.

65 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close