देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातील नवभारतात नक्षलवादाला थारा नाही – अमित शहा

केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वयाने नक्षलवाद उखडून टाकणे शक्य – शहा

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नवी दिल्ली , दि. 27 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातील नवभारतात नक्षलवादाला थारा नसल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. यावेळी वित्त, रस्ते वाहतूक व महामार्ग, कृषी, ग्रामीण विकास, पंचायती राज, कौशल्य विकास व उद्योजकता, आदिवासी विकास या खात्यांचे मंत्री, गृह राज्यमंत्री, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओदिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

नक्षलवादी संघटना लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात असून, सत्ता हस्तगत करण्यासाठी तसेच स्वत:च्या फायद्यासाठी वंचित, निर्दोष लोकांची दिशाभूल या संस्था करतात. नवभारताचा दृष्टिकोन सर्वसमावेशक विकासाचा आहे, असे शहा यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात नक्षलवादी हिंसाचाराचे प्रमाण घटले आहे. सुरक्षा दलांचे हे यश आहे. 2009 मध्ये नक्षलवादी हिंसाचाराच्या 2258 घटना घडल्या. हे प्रमाण 2018 मध्ये 833 वर आले आहे. नक्षली हिंसाचारात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 2009 मध्ये 1005 होते. ते 2018 मध्ये 240 वर आले. 2010 मध्ये नक्षली हिंसाचाराचे 96 जिल्हे ग्रस्त होते. 2018 मध्ये 60 जिल्हे नक्षलग्रस्त होते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्यांची भूमिका महत्वाची असते. केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वयाने नक्षलवाद उखडून टाकणे शक्य होईल.

नक्षलवादी संघटनांना होणारा निधीचा पुरवठा रोखण्याची गरज व्यक्त करुन यादृष्टीने राज्यांनी उचललेल्या पावलांचे त्यांनी कौतुक केले. केंद्र, राज्य सरकारांना पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 2015 च्या राष्ट्रीय नीति आणि कार्ययोजनेचा उल्लेखही त्यांनी केला. या धोरणांतर्गत, स्थानिक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याला प्राधान्य असल्याचे शहा यांनी सांगितले.

49 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close