कोकण

श्रावण गीतांच्या तालावर महाडकर रसिक झाले धुंद रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….!!

महाड – रघुनाथ भागवत

रायगड , दि. २९ :- अमोल परब निर्मित आदर्श संगीत अकॅडमी बिरवाडी-महाड आयोजित श्रावणसरी – श्रावण गीतांचा अनोखा नजराणा या मराठी वाद्यवृंदाचा शुभारंभ रविवारी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे पार पडला असून एकाहून एक सरस अशी निवडक वर्षा गीते आणि त्याला प्रेक्षकांनी दिलेली दाद यामुळे कार्यक्रमाने एक उंची गाठली.
यावेळी अमोल परब, मारुती जाधव, ज्ञानेश्वर काकडे, रक्षिता दासगावकर, शुभदा मोकल, नम्रता लाड, वैष्णवी इंगळे यांनी नभ ऊतरू आल…पुन्हा पावसाला सांगायचे… चिंब पावसानं रानं झालं…. ढग दाटून येतात घन ओथंबून येती…. आला आला वारा… गारवा… रिमझिम धून…. अधीर मन झाले… कधी तू रिमझिम झरणारी बरसात… वादळ वार सुतलग भिजून गेला वार… हिरवा निसर्ग हा भवतीने… सुख पावसा परी… ही सरस गीते गात प्रेक्षकांना खिळवून टाकले. विनोदाचा बादशाहा प्रसिद्ध निवेदक सचिन घडशी यांनी पावसावर आधारित कविता तसेच कवी सुनील पवार यांनी खुमासदार निवेदन करत कार्यक्रमात रंगत आणली. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात या सुरेख गीतांना सुप्रसिद्ध ढोलकीपटू संजय सावंत, शुभम सावंत, वादक जितू तांबे, संतोष मोहिते, भूषण कदम यांनी साथ दिली, तर प्रकाश योजना नंदू भागवत, रंगमंच व ध्वनी संयोजन निलेश आडे यांनी पाहिले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतमध्ये असे म्हणाले की, सुंदर असा हा उपक्रम राबवला आणि खरोखरच महाडच्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. यामध्ये आदर्श अकॅडमी हे सुंदर काम करीत आहे. यामध्ये नक्कीच सुंदर गुणवान विद्यार्थी घडतील आणि कला क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान देतील. अमोल परब यांनी हे उचलेले पाऊल यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी त्यांना नक्कीच आम्ही मदत करू अशी ग्वाही देखील यावेळी दिली. आदर्श संगीत अकॅडमी या संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले असल्याने गायन, हार्मोनियम, तबला, मृदुंग अशा कलेत एकूण 30 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. असे अनेक विद्यार्थी अमोल परब यांच्यामुळे गुणवान विद्यार्थी घडतील आणि नक्कीच त्यांचं भवितव्य यशाच्या शिखरावर जाईल व त्यांना लागणारी सर्वोतोपरी मदत आम्ही करू असे देखील मान्यवरांनी मनोगतात सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्कार धामचे अध्यक्ष नथुराम निंबरे, रायगड जिल्हा भूषण तथा ज्येष्ठ रंगकर्मी सुधीर शेठ, सुहासिनी नाट्यधारा संस्थापक सुनील यमगर तसेच छाया परब यांच्या शुभहस्ते झाले.

89 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close