Home बुलडाणा सीसीआयची कापूस खरेदी सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार ,  शेतकऱ्यांनी घाई न करता निवांत...

सीसीआयची कापूस खरेदी सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार ,  शेतकऱ्यांनी घाई न करता निवांत कापूस विक्रीस आणावा – डॉ अरविंद कोलते

222

देऊळगाव राजा – रवि आण्णा जाधव

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी(सीसीआय)भारतीय कापूस महामंडळाने सप्टेंबर(२०२०)पर्यंत कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असें आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद कोलते यांनी केले आहे.

यावर्षी सीसीआयचा उपअभिकती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व सीसीआयने राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत.या दोन्हीकडे कापूस विक्रीचा ओघ वाढला आहे. हमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे.सीसीआयने यावर्षी विदर्भात३८खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. एफएक्यू दर्जाचा कापूस या केंद्रावर खरेदी केली जात आहे. भारतीय कपास निगम लिमिटेड(सीसीआय)चे महाप्रबंधक अजयकुमार यांनी १मार्च रोजी आदेश जारी करित सप्टेंबर २०२०पर्यंत कापूस खरेदी केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता कापूस निवांत विक्रीस आणावा म्हणजे कापूस खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही आणि सुरळीत खरेदी करता येईल,असे आवाहन कृषी उत्पन्न बाजाराचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद कोलते यांनी एका प्रशिध्दी प्रत्रकाव्दारे केली आहे.