रायगड

क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानतर्फे ७७ वा हुतात्मा दिन साजरा….

प्रतिष्ठानने दिला प्लास्टिकमुक्त महाडचा संदेश; गणेश मंडळांना केले कापडी पिशव्या वाटप…

महाड – रघुनाथ भागवत

रायगड , दि. ११ :- सन १९४२ साली नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वखाली निघालेल्या किसान मोर्चाच्या ७७ च्या स्मृतिदिन क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व शहीद हुतात्म्यांच्या आहुतीस्थळांच्या ठिकाणी जाऊन प्रतिष्ठानच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने प्रतिष्ठानने महाडकर नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर अमलात आणण्याचा संदेश दिला. यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने महाड शहरातील संत रोहिदास नगर गणपती मंडळ, नूतन मित्र मंडळ – नवी पेठ, सरेकर आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबट आळी गणेश मंडळ कोहिनूर मित्र मंडळ, जुनी पेठ गणेश मंडळ आदी गणेश मंडळांच्या ठिकाणी जाऊन कापडी पिशव्यांचे वाटप केले. तसेच त्याठिकाणी उपस्थित नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रबोधन केले.

कापडी पिशव्यांचा वाटप क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठान, महाड नगर परिषद आणि शिवतांडव ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.

यावेळी क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित पाटील, सचिव अमर ननावरे, उपाध्यक्ष नीरज चौधरी, सदस्य रुपेश देवळेकर, सचिन वडके, पत्रकार दिलीप अंबावले, महाड नगर पालिकेचे नगरसेवक प्रमोद महाडिक, बंटी पोटफोडे तसेच ढोल पथकाचे कल्पेश पाटील, सिद्धेश जाधव आदि उपस्थित होते.

25 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close