नांदेड

मुखेड विधानसभेसाठी आणखीन एक नवीन चेहरा पुढे….

भाजपाकडून पंजाबराव पाटील वडजे इच्छुक उमेदवार म्हणून सद्याला पुढे येत आहेत..

आदी बनसोडे

मुखेड , दि. ११ :- शेतकऱ्यांचे कैवारी बहुजन समाजाचा बुलंद आवाज भावी आमदार पंजाबराव पाटील वडजे मसलगेकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान .सध्याला मुखेड कंधार विधानसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपाकडून शेतकऱ्यांचे कैवारी बहुजन समाजाचा बुलंद आवाज मा.पंजाबराव पाटील वडजे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
आज शेतकऱ्यांनी व बहुजन जनसामान्य पंजाबराव पाटील वडजे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. “अभी नही तो कभी नही” या भूमिकेतून आत्ताच सर्वांनी पुढे येऊन पाठिंबा देण्याची गरज आहे कारण विद्यमान आमदाराने बहुजनाचे नेतृत्व पुढे येऊ नये यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील बहुजनांना प्रत्येक ठिकाणी डावलण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. पंजाबराव पाटील वडजे यांनी स्वर्गीय गोविंदरावजी राठोड व त्यानंतर डॉक्टर तुषार राठोड यांच्या निवडणुकीत स्वतःची गाडी व पूर्ण वेळ देऊन वाडी तांड्यावर सर्व गावे मतदारसंघात फिरून जोरदारपणे प्रचार केला पण त्याचं बहुजनाचे नेतृत्व करणाऱ्या पंजाबराव वडजे यांनी आधी पंचायत समिती उमेदवारी मागितली असताना मुखेड येथील विद्यमान आमदाराकडून मिळू न देण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यांचा विरोध असतानासुद्धा वरिष्ठांनी एबी फॉर्म डायरेक्ट दिला त्यानंतर निवडणुकीमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचा उमेदवार पेठवडज सर्कल मध्ये दिला नाही केंद्र व राज्यात भाजपची सत्ता व आमदार भाजपचा असतानासुद्धा पेठवडज मध्ये भाजपचा जिल्हा परिषद उमेदवार नव्हता त्यामुळे पंजाबराव वडजे यांना एकाकी पाडून त्यांना निवडून न येण्याची व्यवस्था येथील आमदारांनी केली होती त्यांच्या बरोबर प्रचारासाठी फक्त शेवटच्या एका सभेला आमदार आले आणि ती सभा अर्धवट सोडून मध्येच निघून गेले त्यामुळे सभा विस्कळीत झाली. तरीसुद्धा पंजाबराव वडजे पाटलांनी त्यांनी धीर सोडलेला नाही कामाच्या जोरावर व पक्षाच्या धोरणानुसार पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणीस यांच्या कार्यांच्या जोरावर पंचायत समिती मध्ये निवडून आले. त्यानंतर पण प्रोटोकॉल न पडता पंचायत समितीच्या सदस्याला डावलण्याचा प्रकार केला गेला, अशा प्रकारे इतर बहुजनाच्या नेतृत्वाला तडा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांचे प्रमुख उदाहरण म्हणजे तालुका अध्यक्ष नामदेव पाटील हे विद्यमान आमदारांच्या विरोधात देत असलेल्या वर्तमानपत्रातील स्टेटमेंट वरुन लक्षात येते तसेच भारतीय जनता पार्टी पडत्या काळात जिवंत ठेवणारे सोनटक्के सर माधव अण्णा साठे यांनी प्रयत्न करून मुखेड तालुक्यात जिवंत ठेवली अशा प्रकारे नगरपरिषद नेत्यांनी पक्षबांधणीसाठी खूप मेहनत घेतले आहे सोनटक्के सरांनी सुद्धा विद्यमान आमदारांनी पक्ष स्वतःच्या घरापुरता मर्यादित केला हे कारण दोन वेळेस आमदाराची टर्म त्यानंतर नगरपरिषदेसाठी बंधूला उमेदवारी जिल्हा परिषद मध्ये सुद्धा घरातीलच उमेदवारी दिली गेली त्यानंतर बळवंत पाटील बेटमोगरेकर यांना सुद्धा डावलण्यात आले यांनी सुद्धा खंत व्यक्त केली, त्यांचे सुद्धा खच्चीकरण विद्यमान आमदारांनी केले आहे, त्यानंतर बहुजनाचे वरिष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोरेगावकर हे सुद्धा आमदारांच्या वागणुकीला कंटाळून आपली स्वतःची उमेदवारी पक्षाकडे मागितले आहे, यावरुन त्यांनी सुद्धा आमदारांचे विरोधक आहेत असे स्पष्ट चित्र सध्या पहावयास मिळते आहे.

त्यांच्याबरोबर माधव अण्णा साठे असो, व्यंकटराव पाटील चांडोळकर असो, त्यांना जांब सर्कलमधून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळणे अपेक्षित होते पण विद्यमान आमदारांनी स्वतःच्या पुतण्याला हैदराबाद येथून आणून उभे केले यावरून त्यांची बहुजन अपेक्षा घराणेशाही लाच पसंती आहे हे दिसून येते मुख्य नगर परिषदेमध्ये यांनी आग्रह करून स्वतःच्या भावासाठी उमेदवारी आणली व त्याठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सुद्धा प्रचाराला आले होते विद्यमान आमदार व केंद्रात राज्यात सरकार असताना सुद्धा मुखेडच्या जनतेने या घराने शाहीला कंटाळून विद्यमान आमदारांच्या बंधूला नगरपरिषदे मध्ये चारही मुंड्या चित्त करुन धुळ चारविले अशा प्रकारे त्यांच्या घराला जनतेनेच बाजुला केले आहे, भाजपचे नगरसेवक निवडून दिले पण भाजपचा नगराध्यक्ष पाडण्याचे काम केले यावरून जनसामान्यांमध्ये अशी भावना झाली आहे की एवढ्या सर्वांचा रोष असताना सुद्धा हा मतदारसंघ अगोदर आरक्षित होता तो आता खुल्या प्रवर्गासाठी झालेला असताना सुद्धा जर पुन्हा विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली तर सर्व बहुजन ज्या प्रमाणे औरंगाबाद चंद्रकांत खैरे यांच्या बाबतीत जे घडले ते यांच्या बाबतीत घेण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारची भावना कार्यकर्ते व मतदार बोलून दाखवीत आहेत.तसेच सध्या विद्यमान आमदारांच्या विरोधामध्ये माझ्याबरोबरच रामदास पाटील यांनीसुद्धा ही उमेदवारी मागत आहेत व त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून कोणत्याही जनसामान्यांचे शेतकऱ्याचे व बहुजनाचे काम केले नसताना वातावरण निर्मिती केली आहे तरी त्यांच्या बाबतीत आम्हाला एवढेच म्हणणे आहे आहे गेली पंधरा वर्षापासून पंजाबराव वडजे पाटील स्वतःचे घरदार सोडून व्यवसाय सोडून मुखेड कंधार विधानसभा मतदार संघात व पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यासाठी बहुजनांसाठी सर्वसामान्यांसाठी काम करतात त्याच प्रकारे रामदास पाटलांनी सुद्धा पुढील पाच वर्ष कामे करावी त्यानंतर आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका घेणार आहोत तरी या वेळेस रामदास पाटलांनी बहुजनाचे नेतृत्व म्हणून आणि शेतकरी शेतमजूर जनसामान्यांचे प्रश्न जाणारा नेता म्हणून पंजाबराव पाटील यांच्या पाठीमागे उभे रहा अशी आमची भावना आहे अन्यथा कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना जाईल की कोणतेही शेतकऱ्यांचे जनसामान्यांचे काम न करता फक्त वर्तमानपत्रात हवा निर्माण करायची उमेदवारी मागायची त्यामुळे लोकांचे काम करण्याचे भानगडीतच कोणी पडणार नाही म्हणून अशा प्रकारच्या चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाऊ नये, यासाठी रामदास पाटलांनी यावेळेस आम्हाला पाठींबा द्यावा आणि तीदेखील पुढच्या वेळेस आम्ही त्यांना निश्चितपणे पाठिंबा देणार व भाजपा जगातला नंबर वन चा पक्ष झालेला आहे आणि ते आता विरोधी पक्षाचे अस्तित्व शिल्लक राहा राहताना दिसत नाही अशा वेळेस घराणेशाही संपून पक्षांतर्गत लोकशाही राहण्यासाठी पंजाबराव वडजे पाटील यांना उमेदवारी मिळणे अत्यंत गरजेचे आहे…

पंजाबराव वडजे पाटील मित्र मंडळ
(भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ) यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे….

168 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close