बुलढाणा

सतत 92 वर्ष पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या गणेश मंडळाचा मूर्तिकार हरिभाऊ राऊत यांच्याकडून सत्कार ..

देऊळगाव माळी – कैलास राऊत

मेहकर , दि. ११ :- महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायचं 2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आगमन झालं. गणपती बाप्पा मोरया आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचं आबालवृद्धांनी स्वागत केलं. श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्तानं अवघा महाराष्ट्र भक्तिरसात चिंब झाला होऊन मागिल दहा दिवस हा जल्लोष पाहायला मिळाला.
महाराष्ट्राचा महाउत्सव असलेल्या गणेशोत्सवात पहाटेपासूनच बाप्पाची आरती ,काही सामाजिक उपक्रम , महाप्रसाद, विविध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातल्या गणेश भक्तच्या संकल्पनेतून आपापल्यापरीने प्रत्येक गणेश मंडळ हे गणराया च्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेले होते, मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील गणपती गणेश मंडळाची १९२७ साली स्थापना झालेली असून या मंडळाच्या स्थापनेमध्ये स्व. येडुजी मगर ,स्व.कुंडलिक गाभणे ,स्व.दगडु मगर ,स्व.सखाराम मगर यांचा सक्रिय सहभाग होता.

मंडळाच्या स्थापनेपासून आज 2019 पर्यंत सातत्याने 92 वर्ष इको फ्रेंडली गणेश मूर्ति स्थापना करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश दिल्याबद्दल व तो यशस्वीरित्या रित्या पूर्ण केल्याबद्दल मंडळाचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार प्राप्त, मूर्तिकार हरिभाऊ राजाराम राऊत व त्यांच्या पत्नी सौ.शांताबाई राऊत यांनी गणपती गणेश मंडळांचे पदाधिकारी अध्यक्ष विष्णु खरात, उपाध्यक्ष त्र्यंबक पाटील, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व गणेश मंडळाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या,

यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी विश्वनाथ मगर,जयराम गिर्हेसर, बळीराम जागृत, मा. सैनिक कुंडलिक मगर,रवी पाटील, भिकाजी मगर, मधुकर लोणकर, अनिल मगर ,दत्तात्रय गिर्हे, त्र्यंबक मांयजी मगर, रामदास मगर टेलर, विष्णू मगर, विष्णू गिर्हे यांच्या सह इतर असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. इको फ्रेंडली गणेश मूर्ती ची ही परंपरा गणपती गणेश मंडळाच्या वतीने शेवटपर्यंत कायम ठेवण्यात येईल असा आशावाद यावेळेस गणपती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

69 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close