नांदेड

अंबाडी येथे एक गाव एक गणपती व मोहरम सण उत्सहात साजरा.

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

किनवट , दि. ११ :- बालाजी सिलमवार-किनवट येथून जवळच असलेल्या अंबाडी येथे समस्त गावकर्याच्यावतीने एक गाव एक गणपती हा कार्यक्रम राबविण्यासाठी गुणाजी पंडलवार यांच्या मार्गदर्शना खाली गावात बैठक घेऊन सर्वानुमते गावातील प्रतिष्टीत नागरीक तथा सरपंच प्रतिनिधी श्री कैलाशराव सिलमवार यांची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी तर श्रीकांत सदुलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्ष म्हणून मंगेश खामनकर व कोषाधक्ष अक्षय वानखेडे व कार्यकारणी सभासद म्हणून पोषट्टी नक्कावार,रवी मुराडवार,अक्षय पंडलवार,गजानन बावणे,व्यंकटी सदुलवार,अविनाश गेडाम,ज्ञानेश्वर चव्हाण,श्रीकांत पताणीवार,राजू खामनकर,आदींची निवड करण्यात आली.गणपतीची मूर्ती स्थापना श्री नारायण बाबा सवारी बंगला येथे बसविण्यात आली तसेच त्याबाजूलाच मौलाली बाबा सवारी बसविण्यात आली यावेळी सवारी उत्सव समितीमध्येही श्री कैलाशराव सिलमवार यांचा बहुमान आहे सवारी उस्तव समितीमध्ये किशन सिलमवार, संजय कोगुरवार,विश्वनाथ काणजोडे,विलास गंदलवार,कठकमवार साहेब,संतोष निमराज,आशिष घोटीकर,शिवकांत कोल्हावार,अल्ताफभाई,शेषेराव मोहिते,गोपाल सिलमवार,सह आदी शेकडो भक्तगनानी उपस्थिती लावली.यावेळी गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक शांततेत निघाली. अंबाडी गावात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी शेकडो हिन्दू मुस्लिम बांधवानी या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी किनवट पोलीस स्टेशनचें पोलिस निरीक्षक डी.एम.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश चित्ते,पोलीस जमादार बोन्डलेवाड,नारायण सदूपटलेवार,केंद्रे सह संतोष जुंनगरे,राजू सिलमवार,परमेश्वर मुराडवार,प्रकाश पंडलवार,भूमंना महाराज,मधुकर पैडीपल्लीवार,बालाजी केंद्रे,उपसरपंच विषुदानंद देठे आदींनी सहकार्य केले.

155 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close