गुन्हेगारी

दरोडा टाकण्याच्या तय्यारीत असलेल्या दरोडेखोरांना फिल्मी सटाईल पाठलाग करून पकडले

अमीन शाह / आरिफ पोपटे

वाशिम , दि. ११ :- जिल्ह्यतील सेलू बाजार येथे दरोडा टाकण्याच्या तय्यारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी फिल्मी सटाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या अवळल्या आहेत चार दरोडेखोर पळून जाण्या यशस्वी झाले आहे .

या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार सेलू बाजार ते अकोला रोडवर राजेश शिवलाल बंगलिया यांच्या घरा जवळ काही संशयस्पद अनोळखी इसम थांबले होते या बाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी घटना स्थळ गाठून आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला असता चार दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर दोन दरोडेखोर पोलिसांच्या तावडीत सापडले पकडण्यात आलेल्या आरोपी कडून पोलिसांनी दरोडा टाकण्याचा साहित्य जप्त करण्यात आला आहे त्यांच्या ताब्यातून इनोवा गाडी नंबर mh , 37 , 7077 ही मिळून आली मंगल नारायण चव्हाण 40धानोरा जी वाशिम , विष्णू सुखदेव चव्हाण 39 रा , पिंपळगाव पुसद , यांना अटक करून विचारले असता पळून गेलेले आरोपी सुरेश चव्हाण करपा मानोरा , बाबाराव चव्हाण , मिथुन जाधव आसेगाव , रामू मोहिते आसेगाव , हे चार आरोपी पळून गेले आहेत पकळण्यात आलेल्या आरोपी कळून एक तलवार , लोखंडी कट्यार , तलवार , रॉड , जप्त करण्यात आली असून पकडण्यात आलेले सर्व आरोपी अट्टल दरोडेखोर आहेत अकोला रोडवर असलेला पेट्रोल पंप लुटण्याचा त्यांचा इरादा होता ही कार्यवाही पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे , तांबे , मंजुषा मोरे , गजानन जवादे , महल्ले , अंबादास राठोड , अमोल मुंडे , रवी वानखेडे , तथा इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद सोनवणे यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी भा , द , वि 399 , 400 , 402 आर्म एकट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तोतया पोलीस पकडल्याची अफवा…

काल मंगरूलपीर परिसरात सेलू बाजार येथे तोतया पोलिस पकडल्याची अफवा पसरली होती अति घाई करणाऱ्या काही न्युज पोर्टल नि ही बातमी ही लावून टाकली होती मात्र पोलिसांनी आज या घटनेचा उलगळा केला आहे , अखेर तोतया पोलीस नव्हे तर ते दरोडेखोर होते ती अफवाच होती ही बाब स्पष्ट झाली आहे .

184 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close