कोकण

विधानसभा आखाडा – “तटकरे × तटकरे = तटकरे” श्रीवर्धन मतदारसंघात सामना रंगण्याच्या वाटेवर; पण “बहिण × भाऊ” कि “नणंद × भावजाई”?

प्रतिक मोरे

रायगड , दि. १२ :- रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खा. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात आपली ताकद शिवसेनेचे माजी मंत्री अनंत गीते यांना लोकसभेत पराभुत करुन दाखवुन दिली आहे. विधानपरिषदेत राष्ट्रवादी पक्षाकडे बहुमत नसताना देखील त्यांनी आपल्या मुलाला निवडुन आणले. त्यामुळे रायगडमधील राजकारणातील जादुगार म्हणुनच तटकरेंना ओळखले जाते. सुनील तटकरेंना रायगडमध्ये आव्हान देणार नेत्रुत्व सध्यातरी पाहण्यात येत नाही. मुला पाठोपाठ मुलीलाही आमदार करण्याकडे त्यांची वाटचाल काही दिवसांपासुन दिसुन येत आहे.खा. सुनील तटकरे विधानसभा निवडणुक लढत आलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातुन त्यांच्या कन्या रायगड जिल्हापरीषद अध्यक्षा अादिती तटकरे विधानसभा निवडणुक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीवर्धन मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचे दिसुन येते.

आमदार लढतीसाठी सज्ज

श्रीवर्धन मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुक लढवुन सुनील तटकरेंचे पुतणे अवधुत तटकरे राष्ट्रवादी पक्षाकडुन विजयी झाले होते. अवधुत तटकरे सुनील तटकरेंचे बंधु अनील तटकरे यांचे जेष्ठ पुत्र आहेत. काका पुतण्यामध्ये असलेला मनमुटाव लोकांपासुन लपला नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यक्रमात अवधुत तटकरे कधी दिसलेच नाहीत. आता ऐण निवडणुकीच्या तोंडावर अवधुत तटकरेंनी आपल्या वडिलांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्रीवर्धन मतदारसंघातुन मागील निवडणुक विजयी झाल्यामुळे शिवसेनेकडुन त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तटकरेंना तटकरेच आव्हान देणार असल्याच दिसुन येत आहे.

काय असणार सेनेतील जुन्या कार्यकर्त्यांची भुमिका?

एवढ्या वर्ष ज्यांना विरोध केला त्यांचाच प्रचार करायचा यावर सेनेतील जुने कार्यकर्ते काय करतील या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विषेश म्हणजे मागील निवडणुकीत अवघ्या ७७ मतांनी पराभव पत्करलेले रवी मुंडे, मागील रोहा नगरपरिषद निवडणुकीत तटकरेंना घाम फोडनारे समीर शेडगे, जोमाने निवडणुक लढविण्यासाठी तयारीला लागलेले जिल्हाप्रमुख अनिल नवगणे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तटकरे विरुद्ध तटकरे

राष्ट्रवादीकडुन आदिती तटकरे आणि शिवसेनेकडुन अवधुत तटकरे यांना उमेदवारी मिळाल्यास तटकरे विरुद्ध सामना पाहायला मिळुन काकाच्या साम्राज्याला पुतण्या सुरूंग लावणार का? हे येणारा काळच सांगेल. तसेच सौ. तटकरे यांना पण संधी मिळू शकते. त्यामुळे नणंद-भावजाई अशी लढत पाहायला मिळाल्यास काहीच आश्चर्य समजु नये.

“तटकरे × तटकरे = तटकरे”

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लढत “आदिती तटकरे × अवधुत तटकरे” झाली किंवा “आदिती तटकरे × सौ.तटकरे” झाली तरी निवडुन तटकरेच येणार आहेत. त्यामुळे “तटकरे × तटकरे = तटकरे” असाच निकाल असणार आहे.

180 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close